वनरक्षक महिलेला मारहाण करणार्‍या जानकरला पत्नीसह अटक; अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२१ जानेवारी २०२२ । सातारा । पळसावडे गावच्या हद्दीत वनविभागाच्या जागेत काम करणार्‍या मजूरांना दुसर्‍या गावात कामासाठी नेल्याच्या रागातून पळसावडे (ता. सातारा) गावचा माजी सरपंच व वन समितीचा अध्यक्ष रामचंद्र जानकर व त्याची पत्नी प्रतिभा यांनी वनरक्षक सिंधू बाजीराव सानप व त्यांचे पती वनरक्षक सूर्याजी उत्तरेश्वर ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर सातारा तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामचंद्र जानकर याला शिरवळ येथून तर त्याची पत्नी प्रतिभा हिला शाहूनगर (सातारा) येथून अटक केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी दिली.

पळसावडे गावच्या हद्दीत असलेल्या वन विभागाच्या जागेत काम करत असलेले मजूर सानप यांनी प्राणी गणना करण्यासाठी दि.17 रोजी शेजारच्या गावात नेले होते. याचा राग मनात धरून प्रतिभा जानकर हिने सानप यांना मजूर का नेले असे विचारून शिवीगाळ दमदाटी केली. त्यानंतर सानप या सातारा येथे आल्यानंतर आज सकाळी त्यांचे पती ठोंबरे यांच्या मोबाइलवर फोन करून रामचंद्र जानकर यांनी तुझ्या बायकोला घेऊन पळसावडेला ये, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर सानप यांनी घडला प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातलून पुन्हा त्या कर्तव्य बजावण्यासाठी पळसावडे बीटा गेल्या होत्या. दरम्यान त्यांना सोडण्यासाठी त्यांचे पती ठोंबरे हे आले होते.

यावेळी प्रतिभा जानकर हिने ठोंबरे यांना चप्पलने मारहाण करण्यास सुरूवात केली. पतीला सोडवण्यासाठी गेलेल्या सानप यांना रामचंद्र जानकर याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे सानप यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते.


Back to top button
Don`t copy text!