ज्ञानसागर शाळेतील जान्हवी विरकरची महाराष्ट्र संघात निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २५ डिसेंबर २०२४ | बारामती |
बारामतीच्या इतिहासात प्रथमच सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुलमधील कु. जान्हवी विरकर हिची ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या अंडर-१९ महिला एकदिवसीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास या बळावर संघात निवड झाल्याने व ग्रामीण भागातील पहिलीच महिला खेळाडू असल्याने जान्हवी वीरकर ही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आदर्श झाली आहे.
१९ वर्षांखालील महाराष्ट्र संघातील सहभागी खेळाडू आँचल अपवाल (कर्णधार), भूमिका बव्हाण, श्रद्धा गिरमे (उपकर्णधार), गायत्री सुरवसे, सुहानी खंडाळ, ज्ञानेकुरी पाटील, सह्याद्री कदम, श्रुती महाबळेश्वरकर, मपुरी थोरात (विकेट किपर), शाल्मली क्षत्रिय, साक्षी शिंदे, निकिता सिंग, आमनी नंदल, जान्हवी विरकर, श्रेया पाटील, वैष्णवी माशाळकर या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून व पुढील स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सागर मानसिंग आटोळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

जान्हवी उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारतीय संघातसुद्धा स्थान पटकावेल व देशासाठी सर्वोत्तम खेळ करेल, अशी अपेक्षा प्रा. आटोळे यांनी व्यक्त केली आहे.


Back to top button
Don`t copy text!