दैनिक स्थैर्य | दि. ०९ जानेवारी २०२५ | फलटण | फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी आणि शासकीय विभागांच्या कार्यालय प्रमुखांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या सूचनेनुसार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात येणार आहे.
सदर बैठकीचे ठिकाण बदलून महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीत फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय/निमशासकीय विभागाच्या कार्यालय प्रमुख उपस्थित राहणार आहेत. नागरिक संवाद आणि समस्या निराकरण या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आमदार सचिन पाटील यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत फलटणच्या विकासाचा शब्द दिला होता, त्यानुसार या बैठकीचे आयोजन केले आहे. फलटण शहरातील वाहतूक समस्या, रहदारीच्या कोंडी आणि इतर नागरिक सुविधांच्या समस्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक अधिक प्रभावी होण्याची आशा आहे.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)