
दैनिक स्थैर्य । 16 मे 2025। बारामती । जळोची येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित जळोची या सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. 13 जागेसाठी होणार्या निवडणुकीसाठी 50 उमेदवारी अर्ज दाखल झाल्या पैकी 36 उमेदवारी अर्ज वैध झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत फक्त 13 अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अमर गायकवाड यांनी केली.
बिनविरोध निवड झालेले सभासद अर्जुन उद्धव पागळे, अनिल दिनकर आवाळे, रोहिदास दौलत चौधर, महेंद्र शरद सातकर, सुरेश भीमराव विरकर, राजेंद्र गणपत आटोळे, श्रीरंग ज्ञानदेव जमदाडे, महादेव पांडुरंग चौधर (सर्वसाधारण) सुनिता दत्तात्रय आवाळे, सारिका महादेव वीरकर (महिला राखीव), कुसुम राधाकृष्ण बगाडे (अनु. जा. ज. प्रवर्ग) धनंजय रतन जमदाडे (इतर मागास प्रवर्ग) दीपक गुलाबराव मलगुंडे (भ.ज./वि.ज/वि.मा.प्र)
सोसायटी व सभासदांचे हित लक्षात घेऊन ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडण्यासाठी दीपक मलगुंडे, प्रताप पागळे, दत्तात्रय माने, माणिक मलगुंडे, अतुल बालगुडे, राजेंद्र चोपडे, अभिजीत जाधव, शैलेश बगाडे, अमोल सातकर, महादेव चौधर, विष्णुपंत चौधर, दत्तात्रय आवाळे, संतोष आटोळे, पोपट आवाळे, मनोहर जमदाडे, शेखर सातकर, संतोष सुखदेव जमदाडे, सत्यवान गोफणे यांनी परिश्रम घेतले.