जयश्री पतसंस्थेच्या खुंटे शाखेचे उद्या उद्घाटन


स्थैर्य, खुंटे, दि. १ ऑक्टोबर : फलटण येथील जयश्री नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन शाखेचा उद्घाटन समारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर, गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता खुंटे येथे आयोजित करण्यात आला आहे.

या नूतन शाखेचे उद्घाटन काँग्रेसचे नेते अच्युतराव खलाटे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जालिंदर खलाटे पाटील, जिंती विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन अनिल रणवरे, सस्तेवाडीचे तंटामुक्त अध्यक्ष सतीश सस्ते, खुंटेचे सरपंच हनुमंत भिसे, बारामती तालुका दूध संघाचे संचालक प्रशांत खलाटे पाटील, उद्योजक अमित शिंदे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत भोसले, पत्रकार यशवंत खलाटे पाटील यांच्यासह संस्थेचे संचालक व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्यास खुंटे व पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेचे चेअरमन दयानंद पडकर आणि व्हाईस चेअरमन राजेंद्र खलाटे पाटील यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!