जैन सोशल ग्रुपचा पदग्रहण समारंभ उत्साहात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 28 एप्रिल 2025। फलटण । येथील जैन सोशल ग्रुप हा केवळ जैन समाजापुरताच मर्यादित नसून इतरही समाजाबरोबर जोडला गेलेला आहे. त्यांची सर्व समाजाप्रती काम करण्याची जी पद्धत नक्कीच कौतुकास्पद आहे. फलटणच्या तिन्हीही ग्रुपचे काम एकदम शिस्तबद्ध असून रिर्पोटींग बाबत नेहमीच अव्वलस्थानी राहिला आहे. त्यामुळेच या ग्रुपने केवळ रिजन लेव्हल नव्हे तर फेडरेशन लेव्हलपर्यत अ‍ॅवॉर्डस् घेतली आहे. अशा या ग्रुपच्या पदग्रहण समारंभास येण्याचे भाग्य मला लाभले असल्याचे मत जेएसजी इंटरनॅशनल प्रेसिटेंट बिनेरभई शहा यांनी व्यक्त केले.

जैन सोशल ग्रुप, संगिनी फोरम व युवा फोरम सन 2025-2027 मधील नुतन पदग्रहण समारंभाप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र रिजनचे चेअरमन दिलीपभाई मेहता, ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, कोल्हापूर झोन को-ऑर्डिनेटर सौ. रज्जुबेन कटारिया, संगिनी फोरम महाराष्ट्र रिजन चेअरपर्सन नमिताबेन शहा, फलटण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेशशेठ दोशी, महिला सक्षमीकरण कमिटी कन्व्हेनर सौ.स्मिता शहा, व्यसनमुक्ती कमिटी कन्व्हेनर डॉ.सूर्यकांत दोशी, योगा, मेडीटेशन कमिटी कन्व्हेनर सौ.सविता दोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

बिरेनभाई शहा म्हणाले, फलटण ग्रुपचा व माझा गेल्या चार-पाच वर्षापासून जवळचा संबंध आला आहे. फलटण ग्रुपला जेव्हापासून ओळखतो तसा तो लिडर्सचा ग्रुप असल्याचेही मानतो. आधी झालेले अध्यक्षांनी त्यांच्या काळात चांगले काम केले, जे आत्ता झाले आहेत त्यांचीही काम करण्याची क्षमता चांगली आहे व जे पुढे काम करणार आहेत त्यांच्यातही समाजाप्रती काम करण्याची जिद्द व लिडर्सची क्वालिटी नक्कीच दिसत आहे. जैन सोशल इंटरनॅशनल फेडरेशनच्या माध्यमातून बी x बी सिस्टीम राबविण्यात येणार आहे. जैन समाजाचा डेटाबेस तयार करण्याचे काम चालू आहे. या माध्यमातून व्यवसायासंबंधी मदत, नव वधुवरांसाठी मॅट्रीमोनिअल वेबसाईट व जैन समाजातील मुला-मुलींसाठी उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत आदी प्रकारचे प्रकल्प राबविले जाणार आहेत. त्यासाठी जैन बांधवांनी आपली नोंदणी दिलेल्या फॉर्म भरुन देण्याचे आवाहन केले.

ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता म्हणाले, महाराष्ट्र रिजनमध्ये फलटणचे तिन्हीही ग्रुप अत्यंत आगळे वेगळे आहेत. जैन सोशल ग्रुप फलटण हा ग्रुप फक्त जैन समाजपुरताच मर्यादित नसून इतर समाजाबाबतीही संवेदनशील आहे. त्यांनी फलटणमध्ये राबविलेले उपक्रम हे नेहमीच आदर्श ठरले आहेत कारण त्यांचे उपक्रम हे समाजशील असतात. येथील पत्रकारांनीही जैन सोशल ग्रुपच्या उपक्रमांना नेहमीच साथ देऊन प्रसिद्धी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

दिलीपभाई शहा यांनी जैन सोशल ग्रुपचे नूतन अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव सौ.निना कोठारी, खजिनदार राजेश शहा, संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ.मनिषा व्होरा, सचिव सौ.वृषाली गांधी, खजिनदार सौ.विनयश्री दोशी, युवा फोरमचे अध्यक्ष श्री.पुनित दोशी, सचिव सिद्धेश शहा, खजिनदार मिहीर गांधी तसेच त्यांच्या समवेत असणार्या सर्व पदाधिकारी व संचालक मंडळास त्यांच्या पदाची शपथ दिली.

दिलीपभई मेहता यांनी ‘भुकेलेल्याला ना अन्न, व तहानलेल्यांना पाणी देणे’ हे प्रमुख कार्य पदाधिकार्‍यांनी केले पाहिजे, असे आवाहन करून नूतन पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या.

श्रीपाल जैन म्हणाले, माझ्या जीवनातील एक सामाजिक यात्रेची सुरुवात आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची साथ मला बहुमुल्य आहे. अध्यक्ष पदावरुन काम करताना फेडरेशन-रिजनने सुचवलेले उपक्रम तसेच वृद्धाश्रम, मूकबधिर शाळेतील विद्यार्थी यांच्यासाठी उपक्रम राबविणार आहे. महिलांसाठी आरोग्य शिबीरे, तरुणांसाठी स्कील डेव्हलपींग प्रोग्राम राबविणार आहे. शेतकरी बांधवांमध्ये जैविक शेतीविषयक जागरुकता अभियान याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

सौ.मनिषा व्होरा व पुनित दोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मावळते अध्यक्ष व सचिव यांनी आपल्या कार्याचा आढावा सादर करून नूतन अध्यक्ष, सचिव व खजिनदार सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात सामुहीक णमोकार मंत्र पठणाने करण्यात आली. डॉ. मनाली गांधी यांनी नृत्य करून मंगलाचरण सादर केले. प्रितम शहा प्रास्ताविक यांनी केले. यावेळी सौ.सविता दोशी, सौ.अपर्णा जैन, पुनीत दोशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे डॉ.कु.मनाली गांधी व तुषार शहा यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार शहा यांनी आभार मानले.

कार्यक्रमास जैन सोशल ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!