
दैनिक स्थैर्य | दि. 23 फेब्रुवारी 2025 | फलटण | महाबळेश्वर येथे नुकत्याच जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिजनचा कॉन्फरन्स व अवॉर्ड सेरेमनी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात राज्यातील विविध भागांमधून मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते. यात जैन सोशल ग्रुप फलटण, संगिनी फोरम फलटण व युवा फोरम फलटण या तिन्ही ग्रुपचा बहुमान करण्यात आला. जैन सोशल ग्रुप अध्यक्षा सौ. सविता दोशी यांना सर्वोत्कृष्ट अध्यक्ष, संगिनी फोरम अध्यक्षा सौ. अपर्णा जैन यांना सर्वोत्कृष्ट अध्यक्ष, तर युवा फोरम सचिव पुनीत दोशी यांना सर्वोत्कृष्ट सचिव अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.
सन २०२३ ते २०२५ या दोन वर्षाच्या कार्यकाळात जैन सोशल ग्रुप अंतर्गत तिन्ही ग्रुपने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिझन कडून अवॉर्ड सेरेमनी कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले. जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे निर्वाचित अध्यक्ष बिरेनभई शहा, महाराष्ट्र रिजन अध्यक्ष उन्मेशभई करनावट, अवार्ड कमिटी कन्व्हेनर सौ. प्रीती करनावट व प्रीतेश तातेड, इंटरनॅशनल डायरेक्टर महाविरजी पारेख, सोलापुर झोन कॉर्डिनेटर सुनिल लोढा, कोल्हापूर झोन कॉर्डिनेटर रज्जूबेन कटारिया यांचे शुभहस्ते हे पुरस्कार देण्यात आले.
याच कार्यक्रमात शरद शहा स्मृति अभियान कार्यक्रमात उल्लेखनीय कार्याबद्दल जैन सोशल ग्रुप फलटण यांना रत्न स्तंभ व संगिनी फोरम फलटण यांना सुवर्ण स्तंभ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
तिन्ही ग्रुपच्या यशाबद्दल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेश दोशी, श्रीराम बझारचे संचालक तुषार गांधी, जैन सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव प्रीतम शहा, खजिनदार समीर शहा, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, संगिनी फोरम संस्थापक अध्यक्षा सौ. स्मिता शहा, माजी अध्यक्षा सौ. नीना कोठारी, संगिनी फोरम सचिव सौ. प्रज्ञा दोशी, खजिनदार सौ. मनीषा घडिया, युवा फोरम अध्यक्ष तेजस शहा, खजिनदार मिहीर गांधी व तिन्ही ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन केले.
जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिझन सर्व पदाधिकारी व सर्वांच्या सहकार्याने हे यश मिळवू शकल्याचे तिन्ही पुरस्कार विजेत्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाने जैन समुदायाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक योगदानाचे महत्त्व पुन्हा एकदा प्रतिबिंबित केले.