
दैनिक स्थैर्य । 31 जुलै 2025 । फलटण । येथील जैन सोशल ग्रुप समाजहितासाठी नाविन्यपूर्ण योजना करत असते. त्यामुळे हा ग्रुप सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे मत असल्याचे जैन सोशल ग्रुपचे (फेडरेशन) अध्यक्ष बिरेनभई शहा यांनी व्यक्त केले.
येथील जैन सोशल ग्रुप फेडरेशनचे देणगीदार, पंढरपूर येथील पालवी संस्थेचे देणगीदार आणि गुणवंत विद्यार्थी व उद्योजक सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमात ते होते.
यावेळी फेडरेशन उपाध्यक्ष मनेशभई शहा, रिजन उपाध्यक्ष सचिन दोशी, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, सौ. इंदुमती मेहता, फलटण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेश दोशी, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, उपाध्यक्ष प्रीतम शहा, सचिव सौ. निना कोठारी, सहसचिव हर्षद गांधी, खजिनदार राजेश शहा, रिजन कमिटी कनव्हेनर डॉ. सुर्यकांत दोशी, सौ. सविता दोशी, सौ. स्मिता शहा, जैन सोशल ग्रुपचे माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, संचालक डॉ. मिलिंद दोशी, धीरेन शहा, सौ. मनिषा घडिया, संगिनी फोरम अध्यक्षा सौ. मनिषा व्होरा, युवा फोरम अध्यक्ष पुनित दोशी व पदाधिकारी उपस्थित होते.
बिरेनभई शहा म्हणाले, जैन सोशल ग्रुप केवळ जैन सोशल ग्रुप सदस्यांसाठी नव्हे तर संपूर्ण जैन समाजासाठी मदत करत असल्याने या ग्रुपला वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. दोन वर्षापासून व्हाट्सअपवर ग्रुपने राबविलेल्या समाजहिताच्या उपक्रमांची माहिती दिली आहे. संपूर्ण जैन समाजातील लोकांसाठी चांगले कार्यक्रम व नवी दिशा देण्याचे केले आहे. आंतरराष्ट्रीय जैन सोशल ग्रुप फेडरेशनच्या अध्यक्षपदाच्या 2 वर्षाच्या कार्यकाळात केवळ जैन सोशल ग्रुप नव्हे संपूर्ण जैन समाज संघटीत करुन त्यांच्या विविध समस्यांची मांडणी व त्याचे निराकरण करण्यासाठी आपण विद्या विकास, विवाह इच्छुक तरुण-तरुणींची माहिती देणारी वेबसाईट, जैन समाजातील उद्योजक व्यापारी यांच्या नावासह व्यापार विषयक माहिती देणारी वेबसाईट आणि रक्तमित्र माहिती संकलित करण्याच्या 4 योजना तयार केल्या असून आगामी 2 वर्षात जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून त्या प्रभावीपणे राबविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे स्पष्ट करीत त्यापैकी विद्या विकास योजनेत सक्रिय सहभाग घेत फलटण ग्रुपने दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे बिरेनभई शहा यांनी निदर्शनास आणून दिले.
बिरेनभई शहा म्हणाले, जैन समाजातील उद्योजक, व्यापारी यांची व्यापार विषयक माहिती तसेच रक्तमित्र योजनेची गाव निहाय व रक्तगटनिहाय माहिती वेबसाईटवर उपलब्ध केली आहे. या चारही योजनांद्वारे सामाजिक कार्यात जैन सोशल ग्रुपने योगदान दिले आहे. जैन समाजातील 15 ते 25 वयोगटातील मुला-मुलींना एकत्र आणून त्यांना जैन संस्कृतीची माहिती देऊन सोशल मिडियाद्वारे जैन संस्कृतीशी जोडली जातील यासाठी प्रयत्न केला असल्याचे यांनी स्पष्ट केले.
फेडरेशनचे उपाध्यक्ष मनेशभई शहा म्हणाले, विद्या विकास योजनेची संकल्पना बिरेनभई शहा यांनी मांडली आहे. या योजनेत विद्यादूत प्रत्येकी 15 हजार रुपये, विद्या परिषद प्रत्येकी 31 हजार रुपये आणि विद्या टॉप प्रत्येकी 51 हजार रुपयांची देणगी देऊन जैन समाजातील व्यक्तींनी योगदान द्याव पहिल्या वर्षी तीन कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. या रक्कमेतून जैन समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना कर्ज स्वरुपात रक्कम उपलब्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योग व्यवसाय अथवा नोकरीमध्ये कार्यरत होताच ही रक्कम जैन सोशल ग्रुपला परत करावी. अशा योजनेत असे आवाहन मनेशभई शहा यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र रिजन खजिनदार सचिन दोशी, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनीही मनोगत व्यक्त केले. फलटण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेश दोशी यांना उद्योग भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल, जैन सोशल ग्रुप विद्या विकास योजनेत सक्रिय साथ घेत प्रत्येकी 15 हजार रुपयांची देणगी दिल्याबद्दल श्रीपाल जैन, मंगेश दोशी, डॉ. सूर्यकांत दोशी, सौ.चंद्रिका समर्थ, सौ.स्मिता शहा, श्रीमती शैला शहा, संगिनी फोरम, युवा फोरम, डॉ. महेंद्र गांधी, सौ. इंदुमती मेहता यांचा, तसेच पंढरपुर येथील पालवी संस्थेस भरीव देणगी दिलेले प्रितम शहा, अतुल कोठाडिया, धीरेन शहा याचा शाल, मोत्याची माळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच साक्षी दोशी, जीवन गोडसे, सर्वेश अभिलाष दोशी, स्वराली व सुयश शितल दोशी यांनी विविध परीक्षेत यश मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. फलटण बस स्थानकावर जैन सोशल ग्रुपने उभारलेल्या स्वागत फलकाचे बिरेनभई शहा यांचे हस्ते अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमात प्रारंभी सौ. अपर्णा जैन यांनी फेडरेशन सुत्र वाचन, राजेंद्र कोठारी व सौ. निना कोठारी यांनी मंगलाचरण सादर केले तर सौ. दीप्ती राजवैद्य यांनी सुत्र संचालन आणि सौ. नीना कोठारी यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.