
दैनिक स्थैर्य । 10 एप्रिल 2025। फलटण । बुधवार पेठ (तानाजी चौक) येथील जय हनुमान मित्रमंडळाच्यावतीने शनिवार दि. 12 रोजी हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त शनिवार दि. 12 रोजी पहाटे 5 वाजता श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाचे भजन, सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी श्री हनुमान जन्मकाळ आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
सायंकाळी 5 वाजता रुद्रावतार ढोल ताशाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 7 वाजता महाआरती, सायंकाळी 7. 30 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री 10 वाजता एकतारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.