
दैनिक स्थैर्य । 11 एप्रिल 2025। फलटण – येथील बुधवार पेठेतील जय हनुमान मित्र मंडळाच्यावतीने हनुमान जन्मोत्सवानिमित्त शनिवार दि. 12 रोजी रात्री दहा वाजता भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे.
जन्मोत्सवानिमित्त एकतारी भजन होणार आहे.
यामध्ये माणकेश्वर एकतारी भजन मंडळ (फलटण), जय मल्हार भजनी मंडळ (फलटण), (सूळ वस्ती) माऊली भजनी मंडळ, एकतारी भजनी मंडळ (साखरवाडी), श्रीकृष्ण एकतारी भजनी मंडळ (नवा मळा) आदी भजनी मंडळे सहभागी होणार आहेत.