दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । फलटण । माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती 15 ऑक्टोबर विद्यालयात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. तसेच जागर स्वावलंबी शिक्षणाचा हा कार्यक्रम देखील झाला.
यावेळी कु. वेदांती चांगण 6 वी हिने डॉक्टर अब्दुल कलाम यांची वेशभूषा करुन मी एपीजे अब्दुल कलाम बोलतोय या विषयावर मनोगत व्यक्त केले. तसेच वृत्तपत्र वाचन काळाची गरज या विषयावर कु. समृद्धी सोनवलकर सहावी, कु. राजलक्ष्मी नाळे पाचवी, चि.ओंकार नाळे आठवी, कु.वैष्णवी हरिहर आठवी, चि. प्रतीक नाळे आठवी या विद्यार्थ्यांनी मनोगतं व्यक्त केली.
यावेळी सुभाष सोनवलकर दुधेबावी व गोपीनाथ डांगे भाडळी या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करून वृत्तपत्र विक्रेता दिन सुद्धा साजरा करण्यात आला.
यावेळी अँडव्होकेट जाधव, मुख्याध्यापक गुंजवटे, व पर्यवेक्षक काळे, ह. भ. प. शिंदे, ज्येष्ठ शिक्षिका सौ. क्षीरसागर, ग्रंथपाल शेख, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. मुळीक उपस्थित होते.
सुभाष सोनवलकर, गोपीनाथ डांगे, सौ, मुळिक यांनी आपली मनोगत व्यक्त केली.