
दैनिक स्थैर्य । 19 एप्रिल 2025। सातारा। येथील जागृती महिला मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गुरुवार दि. 24 रोजी सायंकाळी 5.30 वाजता शाहूकला मंदिर येथे लोकधारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला सौ. वेदांतिकाराजे भोसले या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना व सादरीकरण सौ. स्नेहल दामले यांचे आहे. यावेळी वैदेही कुलकर्णी, पालवी दामले या निवेदन व अभिवाचन करणार आहेत.
कार्यक्रमात राहूल जोशी, श्रुती देवस्थळी, अभिजीत वाडेकर, प्राजक्ता भिडे, पृथा बाम या कलाकारांचे गायन होणार आहे. प्रसन्न बाम, अमित कुटे, विनीत तिकोटकर, राजेंद्र साळुंखे या कलाकारांचे वादन होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा सौ. वैशाली फडणीस, उपाध्यक्षा सौ. रागिनी जोशी व समन्वयक सौ. सुप्रिया भिडे यांनी केले आहे.