
दैनिक स्थैर्य । 15 मार्च 2025। सातारा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने येथील राष्ट्र संवर्धन संस्थेच्यावतीने ‘जागर अहिल्येचा ….’ या कार्यक्रमाचे शनिवार दि 15 मार्च दुपारी 4 वाजता पोलीस करमणूक केंद्र येथे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने पोलिस करमणूक केंद्रापासून देवी चौक, 501 पाटी, शेटे चौक, पोलिस हेड क्वार्टर, पोलिस करमणूक केंद्र या मार्गावर भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
तसेच यानिमित्ताने शनिवार दि. 25 रोजी 5. 30 वाजता ज्येष्ठ लेखिका श्रीमती दीपाली पाटवदकर यांचे अहिल्यादेवी यांच्या चैतन्यदायी कर्तृत्वाविषयी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रसंवर्धन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.