
दैनिक स्थैर्य । 6 ऑगस्ट 2025 । फलटण । रा. दालवडी, ता. फलटण येथील प्रगतशील शेतकरी जगन्नाथ श्रीपती बनकर (वय 90) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 विवाहित मुले, 1 विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांनी फलटण तालुक्यातील अनेक विकास सोसायट्यांमध्ये सेक्रेटरी म्हणून उत्तम काम केले होते. सहकार क्षेत्रातील जुन्या पिढीतील सेवानिवृत्त सेक्रेटरी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
दै. ऐक्यचे दालवडी येथील वार्ताहर दत्तात्रय बनकर यांचे ते वडील होत. त्यांच्या अंत्यविधीस सहकार, शिक्षण, पत्रकारिता, कृषी वगैरे विविध क्षेत्रातील मान्यवरांसह, आप्तेष्ट सहभागी झाले होते.