इझमायट्रिपचा ट्रॅव्हल कार्निवल सेल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । मुंबई । इझमायट्रिप या भारतातील दुस-या सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल तंत्रज्ञान व्यासपीठाला त्यांच्या प्रिमिअम फेस्टिव्ह सीझन ऑफर्स पॅकेजच्या शुभारंभाची घोषणा करताना आनंद होत आहे. आजपासून ट्रॅव्हल कार्निवल सेल इझमायट्रिपवर सुरू झाला आहे. हा सेल १० ऑगस्ट २०२२ पर्यंत सुरू राहिल आणि काही भव्य डिल्स देईल. तसेच ३ ऑगस्ट २०२२ ते ७ ऑगस्ट २०२२ पर्यंत इझमायट्रिप वेबसाइट व अॅपवरून विमान तिकिटे, हॉटेल्स, बसेस व हॉलिड पॅकेजेसवर काही निवडक बँक ऑफर्सचा देखील लाभ घेता येऊ शकतो.

ब्रॅण्डने बुकिंग्जकरिता बेसलाइन उत्तमरित्या परिभाषित केली आहे. देशांतर्गत विमान तिकिटांच्या बुकिंगसाठी ग्राहक १२ टक्क्यांच्या म्हणजेच जवळपास २५०० रूपयांच्या सूटचा लाभ घेऊ शकतात आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांच्या बुकिंगसाठी १० टक्क्यांच्या म्हणजेच जवळपास ७५०० रूपयांच्या सूटचा लाभ घेऊ शकतात. हॉटेल बुकिंग्जसाठी २० टक्क्यांची सूट आहे, म्हणजेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हॉटेल्स बुकिंग्जवर अनुक्रमे ५००० रूपये व ७५०० रूपये सूटचा लाभ घेता येऊ शकतो. कंपनी प्रवाशांना अनेक पर्याय देण्यासाठी १५ टक्के सूट देत आहे, म्हणजेच बस बुकिंगवर जवळपास ५०० रूपये आणि हॉलिडे बुकिंग्जवर ५००० रूपये सूटचा लाभ घेता येऊ शकतो.

निर्धारित सेल कालावधीदरम्यान प्रवासी बँक ऑफ बडोदा व स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेचे कार्ड्स आणि कूपन कोड कार्निवल (CARNIVAL) चा वापर करत आकर्षक डिल्स व अतिरिक्त सूटचा लाभ घेऊ शकतात.

इझमायट्रिपचे सह-संस्थापक रिकांत पिट्टी म्हणाले, “इझमायट्रिपने नेहमीच आपल्या ग्राहकांना महत्त्व दिले आहे आणि त्यांना सतत फायदे देण्यावर विश्वास ठेवला आहे. आम्ही सतत आमच्या सेवांमध्ये नाविन्यता आणतो आणि ग्राहकांना आमच्या नवीन व उत्साहवर्धक डिल्स व ऑफर्स देतो. ट्रॅव्हल कार्निवल सेल सर्व प्रवाशांना त्यांच्या फेस्टिव्ह हॉलिडे गरजांची पूर्तता करण्यामध्ये सुलभता देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. आम्ही या स्पेशल ऑफर्स व सूटचा वापर करत अधिकाधिक ग्राहक आमच्यासह त्यांच्या तिकिटांची बुकिंग करतील अशी आशा व्यक्त करतो.”

एअर सेशेल्स, इथिओपियन एअरलाइन्स, ओमान एअर, व्हर्जिन अटलांटिक, एअर इंडिया, विस्तारा, ब्रिटिश एअरवेज, मलेशियन एअरलाइन्स, जपान एअरलाइन्स, एतिहाद एअरवेज, इंडिगो, एअर एशिया, गो फर्स्ट आणि स्पाइसजेट यांसारख्या काही खास भागीदारांसह एअरलाइन तिकिटे बुक केल्यावर इझमायट्रिपच्या सर्वोत्तम ऑफर्सचा लाभ घेता येऊ शकतो. ग्राहकांना अधिक लाभ देण्यासाठी सहयोगी हॉटेल्स व प्रॉपर्टीजवर काही प्रिमिअम पॅकेजेस उपलब्ध आहेत. हे हॉटेल्स व प्रॉपर्टीज आहेत: द लीला, द पार्क, अनंता हॉटेल्स अॅण्ड रिसॉर्ट्स, लेमन ट्री, फॉर्च्यून, क्लार्क्स ग्रुप ऑफ हॉटेल्स, प्राइड हॉटेल्स अॅण्ड रिसॉर्ट्स, स्टर्लिंग, स्प्री, रॉयल ऑर्किड, लॉर्ड्स, रियू हॉटेल्स अॅण्ड रिसॉर्ट्स, फार ईस्ट हॉस्पिटॅलिटी आणि क्रॉस हॉटेल्स अॅण्ड रिसॉर्ट्स.


Back to top button
Don`t copy text!