इझमायट्रिपच्या लिस्टिंगला २ वर्षे पूर्ण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ मार्च २०२३ । मुंबई । आयपीओ लॉन्च केल्याची दोन वर्षे साजरी करत इझमायट्रिप डॉटकॉम हे भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन ट्रॅव्हल टेक व्यासपीठ ग्राहकांना फ्लाइट्स, हॉटेल्स व बसेस बुकिंगवर आकर्षक सवलती देत आहे. प्रोमो कोड ‘इझमायट्रिप’चा वापर करत इझमायट्रिप चे अधिकृत संकेतस्थळ आणि अॅपवर विक्री फायद्यांचा लाभ घेता येऊ शकतो. फ्लाइट बुकिंग्जवर १५ टक्के सूट, हॉटेल बुकिंग्जवर २५ टक्के सूट आणि बस बुकिंग्जवर १० टक्के सूट देत पर्यटकांना सोईस्कर सुविधा देण्यात आल्या आहेत.

इझमायट्रिपचे सह-संस्थापक श्री. निशांत पिट्टी म्हणाले, ‘‘दीर्घकाळापासून इझमायट्रिपला भागधारक, कर्मचारी व ग्राहकांचा प्रबळ पाठिंबा आहे. व्यावसायिकदृष्ट्या कंपनीमधील त्यांच्या रूचीसह व्यापक विश्वासाने ब्रॅण्डला आज या टप्प्यावर आणले आहे. आमचे महत्त्वपूर्ण तत्त्व ग्राहक समाधानाला प्राधान्य देते, ज्याने आम्हाला नेहमीच प्रकाशझोतात ठेवले आहे. याच बाबतीत प्रगती करत आम्हाला आमच्या आयपीओ लिस्टिंगच्या दोन वर्षपूर्तीला साजरे करण्याचा आनंद होत आहे, जेथे आमच्या ग्राहकांना काही सर्वोत्तम डील्सचा आनंद घेता येईल.’’

इझमायट्रिपने लक्षणीय वाढ केली आणि ग्राहक-केंद्रित असल्यामुळे तिला महत्त्व प्राप्त झाले. कंपनीने सुरुवातीला २००८ मध्ये १०० चौरस फूट ऑफिसमध्ये फक्त एका व्यक्तीसह स्वतःला बाजारात स्थापित केले, आता त्यांच्याकडे जागतिक स्तरावर ५०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची टीम आहे. ब्रॅण्डच्या यशामधील मुख्य घटक म्हणजे त्यांनी नेहमीच सुविधा शुल्क आणि उच्च स्तरावरील ग्राहक सेवा न आकारता स्पर्धात्मक किंमती देऊ केल्या आहेत. ग्राहकांना सर्वोत्तम डील्स देण्यासाठी एअरलाइन्स आणि हॉटेल्ससोबत भागीदारी करण्यावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!