दैनिक स्थैर्य । दि. ०१ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । इझमायट्रिप या भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या ऑनलाइन प्रवास तंत्रज्ञान व्यासपीठाने त्यांच्या मार्की ट्रॅव्हल उत्सव फेस्टिव्ह सेल्सच्या दोन टप्प्यांमध्ये लक्षवेधक विक्री संपादित केली आहे. आकर्षक डील्स प्रथम ६ ते १६ ऑक्टोबर २०२ पर्यंत सक्रिय होत्या. या कालावधीदरम्यान कंपनीने ३५० कोटी रूपयांचा अनपेक्षित व्यवहार केला, जो त्यांच्या इतिहासामधील आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम होता. ग्राहकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ट्रॅव्हल उत्सव फेस्टिव्ह सेल्स विस्तारित करत १७ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये राबवण्यात आला. एकूण ६ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबरपर्यंत विक्रीच्या उपरोक्त कालावधीदरम्यान एकूण ५५५ कोटी रूपयांची विक्री करण्यात आली, ज्यामध्ये विक्रीच्या दोन्ही टप्प्यांचा समावेश आहे.
ट्रॅव्हल उत्सव फेस्टिव्ह सेलने सणासुदीच्या काळादरम्यान आकर्षक डील्स दिल्या, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमान तिकिटे, हॉटेल्स, कॅब्स, रेल्वे, बसेस, क्रूझेस व हॉलिडे पॅकेजेसवर मोठ्या सवलतींचा समावेश होता. विक्रीच्या यशामधून प्रबळ रिकव्हरी व वाढती मागणी दिसून येते, जी उद्योगात भारतीय कॅलेंडरमधील व्यस्त पर्यटनादरम्यान दिसून आली आहे. एकूण यंदा दिवाळीला उद्योगामध्ये वाढ झाली. या प्रमोशनने संपूर्ण सणासुदीच्या काळात सर्व पर्यटकांना अनेक लाभ दिले. या सुविधा आगामी सुट्टीचा हंगाम व फेस्टिव्ह वीकेण्ड्ससाठी सर्वोत्तम ऑफर्स व डील्सचा शोध घेणाऱ्या ग्राहकांसाठी निर्माण करण्यात आल्या, ज्यामधून त्यांना तिकिटांवर आकर्षक सूट मिळतील आणि हवाई प्रवासासाठी मोठी रक्कम भरण्यास टाळण्यामध्ये मदत होईल.
इझमायट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक निशांत पिट्टी म्हणाले, ‘’ट्रॅव्हल उत्सव फेस्टिव्ह सेल्स मूलभूतरित्या कौटुंबिक मूल्ये व एकतेला साजरे करतो. भारतातील सणासुदीचा काळ जगातील सर्वात व्यस्त पर्यटन कालावधी मानला जातो आणि आम्हाला विक्रीप्रती मिळालेल्या प्रतिसादाचा आनंद होत आहे. या सेल्सने या सणासुदीच्या काळात आमच्या ग्राहकांना तिकिटे, लॉजिंग व व्हेकेशन पॅकेजेससाठी अधिक लाभ दिले आहेत. आम्ही भविष्यात अधिक ग्राहक-केंद्रित सेल्स पॅकेजेस सादर करण्यासाठी उत्सुक आहोत.’’