इझमायट्रिपचा मोबिक्विकसह सहयोग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ जानेवारी २०२३ । मुंबई । मोबिक्विकचा झिप हा सूट व सुलभ पेमेंट सुविधा देणारे भारतातील अग्रगण्य ‘बाय नाऊ पे लेटर’ व्यासपीठ आता जागतिक उपस्थिती असलेला भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक व्यासपीठ इझमायट्रिपवर कार्यरत आहे. दोन कंपन्या आज वापरकर्त्यांना त्यांचे प्रवास बुक करण्यामध्ये सक्षम करण्यासोबत इझमायट्रिपवरील त्यांच्या फ्लाइट्स, हॉटेल्स व हॉलिडेजवर आकर्षक सूटसह नंतरच्या तारखेला देय भरण्याची सुविधा देण्यासाठी एकत्र आल्या आहेत. वापरकर्ते आता संपूर्ण जानेवारी २०२३ महिना ५००० रूपयांवरील सर्व पेमेंट्सवर ५०० रूपयांची सूट मिळवू शकतात. आता मोबिक्विक वापरकर्त्यांना इझमायट्रिपचे मोबाइल अॅप्‍स आणि/किंवा वेबसाइटवरून बुकिंग केल्यास त्यांच्या प्रवासावर विशेष ऑफर्स मिळतील.

इझमायट्रिपचे सीईओ व सह-संस्थापक निशांत पिट्टी म्हणाले, ‘‘इझमायट्रिप सर्व भारतीयांसाठी विश्वसनीय ट्रॅव्हल सोबती आहे. आम्ही डिजिटली सक्षम भारतीय प्रवाशांना ‘बुक नाऊ पे लेटर’सोबत लोकप्रिय फिनटेक कंपनी मोबिक्विकच्या माध्यमातून पेमेंट्स करताना काही विशेष सूट देत त्यांना सुविधा देण्याच्या दिेशेने पाऊल उचलत आहोत. इझमायट्रिप ग्राहकांना प्रत्येक ट्रिपचे सुलभ नियोजन करण्यासाठी आणि त्यांच्या खिशावर अधिक भार न टाकण्यासाठी सर्वोत्तम पॅकेजेस व डील्स देण्याप्रती कटिबद्ध आहे.’’

मोबिक्विकच्या सीओओ व सह-संस्थापक उपासना ताकू म्हणाल्या, ‘‘लोकांच्या प्रवास योजनांमध्ये कोणत्याही गोष्टीचा, फंड्सचा देखील अडथळा येऊ नये. याच बाबतीत आमचे व्यासपीठ झिप यंदा नववर्षामध्ये अनेक भारतीयांसाठी लाभ घेऊन आले आहे. आम्हाला इझमायट्रिपसोबत सहयोग करण्याचा आणि आमचे प्रमुख पे-लेटर सोल्यूशन झिपसह प्रवास सुलभ करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचा आनंद होत आहे.’’


Back to top button
Don`t copy text!