दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२३ । मुंबई । इझमायट्रिपडॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन टेक ट्रॅव्हल व्यासपीठाने आज ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त झालेली तिमाही व वर्षासाठी त्यांच्या निकालांची घोषणा केली. कंपनीने आर्थिक वर्ष २३ च्या चौथ्या तिमाहीत आणि संपूर्ण आर्थिक वर्ष २३ मध्ये प्रबळ निकालांची नोंद केली. आर्थिक वर्ष २३ साठी ग्रॉस बुकिंग रेव्हेन्यू आर्थिक वर्ष २२ मधील ३,७१५.६ कोटी रूपयांच्या ग्रॉस बुकिंग रेव्हेन्यूच्या तुलनेत ११६.७ टक्क्यांच्या वाढीसह ८,०५०.६ कोटी रूपयांपर्यंत वाढला. या व्यापक वाढीचे श्रेय आपली पोहोच वाढवण्याकरिता आणि ब्रॅण्ड उपस्थितीला चालना देण्याप्रती कंपनीच्या अथक मेहनतीला जाते, तसेच यामध्ये कंपनीच्या सर्व विभागांमध्ये मिळालेल्या गतीचा देखील हातभार मिळाला. आर्थिक वर्ष २३ च्या चौथ्या तिमाहीसाठी ग्रॉस बुकिंग रेव्हेन्यू आर्थिक वर्ष २२ च्या चौथ्या तिमाहीमधील १,१७०.७ कोटी रूपयांच्या तुलनेत वार्षिक ८३.० टक्क्यांच्या वाढीसह २,१४२.८ कोटी रूपये राहिला.
तसेच, अॅडजस्टेड रेव्हेन्यू आर्थिक वर्ष २२ मधील ४००.४ कोटी रूपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३ मध्ये वार्षिक ६८.६ टक्क्यांच्या प्रभावी वाढीसह ६७४.९ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. आर्थिक वर्ष २३ च्या चौथ्या तिमाहीसाठी अॅडजस्टेड रेव्हेन्यूने देखील वार्षिक ८१.० टक्क्यांची प्रबळ वाढ नोंदवली, जेथे आर्थिक वर्ष २२ मधील ९८.४ कोटी रूपयांपासून आर्थिक वर्ष २३ मध्ये १७८.१ कोटी रूपयांपर्यंत वाढ झाली. आर्थिक वर्ष २३ साठी ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २२ च्या १४६.९ कोटी रूपयांच्या ईबीआयटीडीएच्या तुलनेत वार्षिक ३०.२ टक्क्यांच्या वाढीसह १९१.३ कोटी रूपये राहिला.
आर्थिक वर्ष २३ साठी करोत्तर नफा (पीएटी) आर्थिक वर्ष २२ मधील १०५.९ कोटी रूपयांच्या तुलनेत वार्षिक २६.६ टक्क्यांच्या वाढीसह १३४.१ कोटी रूपये राहिला. संपूर्ण वर्षादरम्यान सर्वोत्तम ऑपरेटिंग कामगिरीमुळे ही वाढ शक्य झाली. आर्थिक वर्ष २३ च्या चौथ्या तिमाहीसाठी पीएटी गेल्या वर्षाच्या संबंधित तिमाहीमधील २३.३ कोटी रूपयांच्या तुलनेत ३३.१ टक्क्यांच्या वाढीसह ३१.१ टक्के राहिला.