इझमायट्रिप बनली चेन्नई ब्लिट्झसाठी सहयोगी प्रायोजक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन टेक ट्रॅव्हल व्यासपीठाने प्राइम व्हॉलीबॉल लीगमधील एसपीपी ग्रुप मालकीचा संघ चेन्नई ब्लिट्झसाठी सहयोगी प्रायोजक असण्याचा दर्जा उंचावण्याची घोषणा केली आहे. चेन्नई ब्लिट्झ संघ चेन्नईच्या करिष्माई शहराच्या क्रीडा भावनांचे प्रतिनिधीत्व करतो आणि भारतातील प्रीमियर व्यावसायिक पुरुषांच्या इनडोअर व्हॉलीबॉल लीगमधील आठ राज्य-आधारित संघांपैकी एक आहे.

प्राइम व्हॉलीबॉल लीग ही आगामी व्यावसायिक व्हॉलीबॉल लीग आहे आणि बेसलाइन व्हेंचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा उपक्रम आहे. लीगचे आगामी काळात जगातील पाचव्या सर्वात लोकप्रिय खेळाला सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या खेळांच्या लीगमध्ये बदलून देशाच्या क्रीडा परिदृश्यात बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे.

या सहयोगांतर्गत इझमायट्रिपचा लोगो संघाच्या जर्सी शॉर्ट्सवर खांद्याच्‍या बाजूला लावला जाईल, जो सहयोगी प्रायोजकत्व दर्शवेल. इझमायट्रिपचा ब्रॅण्ड लोगो इतर टीम एंगेजमेंट अ‍ॅक्टिव्हिटीज आणि व्यावसायिक उपक्रमांमध्ये देखील प्रदर्शित केला जाईल, ज्यामध्ये अधिकृत प्रशिक्षण किट आणि टीमचे मार्केटिंग व कम्युनिकेशन कोलॅटरल, तसेच वेबसाइट आणि इतर ऑनलाइन ट्रॅक्शन टूल्स यांचा समावेश आहे. इनडोअर स्टेडियममध्ये इझमायट्रिप लोगो बॅनर देखील असेल. या सहयोगामुळे इझमायट्रिपची पोहोच दशलक्षहून अधिक चाहत्यांपर्यंत पोहोचेल.

इझमायट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संसथापक रिकांत पिट्टी म्‍हणाले, ‘‘व्हॉलीबॉल निव्वळ खेळाच्या गतिमान भावनेला मूर्त रूप देते. नेटच्या सभोवतालची उत्साह वाढवणारी गर्दी आणि टू-अॅण्ड-फ्रो कृतीमध्ये भारतभरातील हजारो व्हॉलीबॉल चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याची क्षमता आहे. २०२३ च्या एडिशनमध्ये चेन्नई ब्लिट्झ संघाशी सहयोग केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि आम्ही त्यांच्याशी संलग्न राहण्याची आशा करतो, जेथे ते त्यांच्या पिवळ्या व नारिंगी रंगछटांमधून सर्वांचे लक्ष वेधून घेत आणि लांब रॅली खेळत विजय मिळवतात. आमच्या वेबसाइटला भेट देणा-या चाहत्यांची संख्या वाढवण्याची आणि या सहयोगाच्या माध्यमातून आमची ब्रॅण्ड दृश्यमानता वाढवण्याची आमची इच्छा आहे आणि आमचा ट्रॅक्शन सानुकूल होईल, यावर आमचा ठाम विश्वास आहे.’’


Back to top button
Don`t copy text!