इझमायट्रिपने २,२६७ कोटी रूपयांचा जीबीआर संपादित केला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । ईजमायट्रिप या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक व्यासपीठाने आज ३१ डिसेंबर २०२२ रोजी समाप्त झालेली तिमाही व नऊमाहीसाठी त्यांच्या निकालांची घोषणा केली. आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये ग्रॉस बुकिंग रेव्हेन्यू (जीबीआर) २,२६७.० कोटी रूपये राहिले. इझमायट्रिपसाठी प्रबळ ग्रॉस बुकिंग रेव्हेन्यूचे श्रेय फ्लाइट व हॉटेल्स विभागातील प्रबळ आकारमान वाढीला जाते. प्रबळ जीबीआर वाढ पॉइण्ट्सचे श्रेय इझमायट्रिपची प्रबळ उद्योग उपस्थिती आणि सलग मिळालेल्या मार्केट शेअरला जाते. आर्थिक वर्ष २०२३ च्या नऊमाहीमधील ग्रॉस बुकिंग रेव्हेन्यू ५,९०७.८ कोटी रूपये राहिला, ज्यामध्ये आर्थिक वर्ष २०२२ च्या संपूर्ण वर्षामधील ३,७१५.६ कोटी रूपयांच्या ग्रॉस बुकिंग रेव्हेन्यूच्या तुलनेत १.६ पट वाढ झाली.

इझमायट्रिपने प्रबळ टॉप लाइन वाढ केली, जेथे समायोजित महसूल आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी जवळपास २०० कोटी रूपयांच्या तिमाही रनरेटपर्यंत पोहोचत १९६.२ कोटी रूपये राहिला, ज्यामध्ये वार्षिक २९ टक्क्यांची, तर तिमाही-ते-तिमाही १६ टक्क्यांची वाढ झाली. तिमाहीसाठी कंपनीचा कार्यसंचालनांमधून महसूल वार्षिक ५७.३ टक्क्यांनी आणि तिमाही-ते-तिमाही २५.५ टक्क्यांनी लक्षणीयरित्या वाढला.

उत्तम टॉप-लाइन वाढ आणि कार्यरत कार्यक्षमतेवरील सातत्यपूर्ण फोकसमुळे इझमायट्रिपचा आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी ईबीआयटीडीए मागील तिमाहीमधील ४०.२ कोटी रूपयांच्या तुलनेत ५८.९ कोटी रूपयांपर्यंत वाढला. तिमाहीदरम्यान कंपनीने कार्यसंचालनांना चालना देण्यासोबत जलद वाढीला चालना देण्यासाठी आपल्या कर्मचारीवर्गामध्ये वाढ करत इन-हाऊस क्षमतांमध्ये गुंतवणूक सुरू ठेवली. तिमाहीसाठी करोत्तर नफा (पीएटी) मागील तिमाहीमधील २८.२ कोटी रूपयांच्या तुलनेत ४१.७ कोटी रूपयांपर्यंत वाढला.


Back to top button
Don`t copy text!