आयवूमीची विस्तार योजना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२३ । मुंबई । भारतातील सर्वाधिक वेगाने वृद्धिंगत होत असलेली ओईएम, आयवूमीने २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत २५० पेक्षा जास्त सर्व्हिस सेंटर्स आणि १५० पेक्षा जास्त अधिकृत आयवूमी डीलर्सचे नेटवर्क उभारण्याच्या वेगवान विस्तार योजनेची घोषणा केली आहे. दक्षिण भारतात विस्तार करण्याबरोबरच कंपनीने या वर्षभरात उत्तर भारतीय बाजारपेठेत राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. सध्या संपूर्ण देशभरात कंपनीची १०० पेक्षा जास्त सर्व्हिस सेंटर्स आहेत. देशाच्या इतर भागांमध्ये विस्तार करून आपल्या अतुलनीय सेवा जास्तीत जास्त ग्राहकांना उपलब्ध व्हाव्यात यावर कंपनीने आपले लक्ष केंद्रित केले आहे.

आयवूमीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अश्विन भंडारी यांनी सांगितले, “विस्तार आणि वृद्धीच्या या यात्रेसाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत. आमच्या ग्राहकांना आमची अत्याधुनिक उत्पादने उपलब्ध करवून देणे आणि विश्वसनीय सेवा तातडीने पुरवून त्यांना संपूर्ण समाधान मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सर्व्हिस सेंटर्स आणि अधिकृत डीलरशिप्सच्या नेटवर्कमध्ये वाढ झाल्यामुळे आम्ही एक विश्वसनीय ईव्ही दुचाकी ब्रँड म्हणून आमची ओळख अधिक मजबूत करून ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त चांगली कामगिरी करून दाखवू याची आम्हाला खात्री आहे. ही महत्त्वाकांक्षी विस्तार योजना ग्राहकांना प्रदान केल्या जाणाऱ्या अनुभवात सुधारणा करून उद्योगक्षेत्रातील अग्रणी हे आमचे स्थान अधिक बळकट करण्याची आमची बांधिलकी दर्शवते. ”

ते पुढे म्हणाले, “लवचिक धोरणे व दृष्टिकोन बाळगून, आमच्या ग्राहकांना पर्यावरणपूरक व क्रांतिकारी उत्पादने व सेवा पुरवून त्यांच्या जीवनात सकारात्मक मूल्य निर्माण करणे हे नेहमीच आमचे उद्दिष्ट असते. उत्पादनांची सुरक्षितता, सुविधा आणि प्रदीर्घ काळ सेवा देण्याची क्षमता या गोष्टींवर आम्ही आमच्या संशोधन व विकासात भर देत असतो. आम्ही प्रामाणिक, वास्तववादी आणि अनुकूल राहून काम करतो याचा आम्हाला अभिमान आहे.”


Back to top button
Don`t copy text!