तो मनोरुग्ण नरभकक्षक एक अफवा; यशोधन ट्रस्टचे रवी बोडके यांचा फेसबुक पोस्ट द्वारे खुलासा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०४ : कोळकी, ता.फलटण येथील कोरोनाबाधितांच्या स्मशानभूमीमध्ये बसून एक मनोरुग्ण मृतदेहाचा काही भाग खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी फलटण शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, ‘‘या ठिकाणच्या मृतदेहांचे संपूर्ण दहन झाले आहे. अन्यविधीसाठी ठेवण्यात आलेले पदार्थ सदर मनोरुग्ण खात असावा’’, असा संशय नगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. सदर मनोरुग्णाला वेळे ता. वाई येथील रवी बोडके यांच्या यशोधन ट्रस्ट मध्ये सोडण्यात आले. त्या नंतर आता काही दिवस उलटले. तो मनोरुग्ण नरभकक्षक होता हो एक अफवाच आहे असा खुलासा यशोधन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवी बोडके यांनी या बाबत फेसबुक पोस्ट द्वारे खुलासा केलेला आहे.

रवी बोडके यांची फेसबुक पोस्ट पुढील प्रमाणे –

काही दिवसापुर्वी नरभक्षक या पाेस्ट ने खळबळ माजली. माणसाने माणसाचे मांस खाणे म्हणजे खुपच भयंकर. हे ऐकलं तर अनेकाच्या अंगाचा थरकाप उडताे. पण आपल्याला या मनाेरुग्ण लाेकाच्या साेबत काम करावे लागते. खुप संयम राखावा लागताे. कोणताही निर्णय घेण्या अगाेदर खुप वेळा विचार करावा लागताे. 20 वर्षाच्या पाेरानं जळत्या चितेतलं प्रेताचं मांस खाल्लं. खुप खळबळ माजली गदाराेळ झाला. त्या रात्री “यशाेधन”चं नाव पुढं आल. हाच विश्वास हाेता “रवि बाेडके” यांचे वरती ठेवलेला. सर्व कागदपत्राची पुर्तेता झाली. आणि त्या तरुणाची रवानगी माणुसकी जपणार्‍या “यशाेधन” मध्ये झाली.

खुप रात्र झाली हाेती रात्रीचे 2 वाजले हाेते.त्याला एका रुम मध्ये साेय केली.रात्रभर मात्र त्याच्या रुम बाहेर कडक पहारा दिला.पहाटे 5 वाजता घरि पाेहचलाे. सकाळी 10 वाजता परत निवारा केंद्रात आलाे.त्याचा RTPCR COVID TEST चा स्वँब सरकारी दवाखान्यात दिला.निवारा केंद्रात आलाे आता त्याला बाेलतं करायचं हाेतं.

काय रे काय नाव . . .
विरु . . . .
साहब भुख लगी है.खाना दाे ना . .

पुढं आलेलं जेवनाचं ताट १ मिनिंटात सपंवलं. त्याच्या चेहर्‍या वरती समाधान दिसलं. अब बाेलाे क्या हुआ क्यु खाया आे मांस. साहब कहा खाया मांस 8 दिनसे भुखा हुँ.ना काेई पाणी देता है ना काेई खाना. रास्ते से गुजर रहा था.आे समशान घाट दिखा साेचा कुछ खाने काे मिलेगा. वहा गया ताे कुछ फल मिला वही मै खा रहा था.

साहब कसमसे नही मांस नही खाया मैने.भुखा था मै. विरु हे बाेलुन रुम मध्ये गेला. तेव्हा समजलं की ताे नरभक्षक नाही. त्याने भुख लागली म्हणुन त्याने ते कृत केले.

विरु मुळचा हैद्राबादचा आहे. थाेडा मनाेरुग्ण आहे कदाचीच घरातुन भरकटला आहे.
विरुची काेविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. लवकरच सरकारी हाँस्पिटल मध्ये मानसिक आजारा वरती उपचार सुरु करणार आहाेत. काेराेना मुळं विरुला नाही पाणि मिळाले नाही जेवन. ताे यशाेधन मध्ये आल्या नंतर त्याला पाेटभर मिळालेल्या जेवना मुळं ताे शांत झाला आहे.
खरं तर ताे नरभक्षक नाही त्या जे केले ते भुख लागली म्हणुन.
लवकरच विरुचं घर सापडले असा विश्वास आहे. कारण माणुसकी अजुन जिंवत आहे.

– रवि बाेडके,
गजानंत निवारा, यशाेधन ट्रस्ट, वेळे, सातारा
9922424236, 9921482223


Back to top button
Don`t copy text!