आयथिंक लॉजिस्टिक्सचा ‘ग्रो ग्रीन’ उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । आयथिंक लॉजिस्टिक्स या देशातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या सास-आधारित शिपिंग प्लॅटफॉर्मने राष्ट्रीय लॉजिस्टिक पॉलिसीला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने विविध शहरांमधील ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या रोपांचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कार्बन उत्सर्जन  कमी करण्यात झाडांचे योगदान मोलाचे असते. झाडांचे हे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्राहकांना रोपे देण्याचा उपक्रम महत्त्वाचे ठरेल. यामुळे कार्बन फूट प्रिंट कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळेल. ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वनस्पतींची रोपे ही आर्द्रतेची पातळी वाढवणारी आणि हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करणारी असतील. ज्यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होईल. हा पर्यावरणपूरक उपक्रम तीव्र कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने उचललेले एक योग्य आणि न्याय्य पाऊल आहे. कारण देशातील कार्बन उत्सर्जनात मोठा हिस्सा असणारे लॉजिस्टिक क्षेत्र हे तिसरे मोठे क्षेत्र आहे.

आयथिंक लॉजिस्टिक्सच्या सह-संस्थापक झेबा सारंग यांनी सांगितले की, “लॉजिस्टिक क्षेत्रामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे निवारण करण्याची जबाबदारी घेण्याचे महत्त्व आम्हाला समजते. , आमची कंपनी खऱ्या अर्थाने एक भारतीय कंपनी असल्याने, आम्हाला दिवाळीच्या या शुभ कालावधीचे औचित्य साधून बदल घडवण्यासाठी पहिले पाऊल टाकायचे होते. तसेच लॉजिस्टिक्स कंपन्यांनी याबाबत कशा प्रकारे कार्य करावे यासाठी एक उदाहरण पुढे ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे.”

आयथिंक लॉजिस्टिक्सच्या गो-ग्रीन उपक्रमामध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि शाश्वतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कर्मचार्‍यांना सहभागी करून घेण्यावर भर देण्यात आला आहे.  त्यासाठी या महिन्यापासून सार्वजनिक वाहतूक दिवस सुरू करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक कर्मचार्‍याला दर महिन्याला एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून प्रवास करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रवासाचे पैसेही देण्यात येणार आहेत. मात्र याकरता त्यांनी त्यांच्या प्रवासाचा सेल्फी पाठवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे टाकाऊ वस्तूंपासून पर्यावरणापूरक वस्तू बनवण्याच्या उपक्रमालाही प्रोत्साहन देण्यात येत आहे. या वस्तूंचा नंतर लिलाव केला जाईल आणि  त्यातून मिळालेले पैसे एका स्वयंसेवी संस्थेला दिले जातील. त्याशिवाय स्वयंसेवी संस्थेसाठी निधी उभारण्याचा प्रयत्न म्हणून दर महिन्याला एक फूड स्टॉलही लावला जाईल. असे विविध उपक्रम कंपनीने आखले आहेत. आयथिंक लॉजिस्टिक्सचा ‘ग्रो ग्रीन’ उपक्रम कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी सार्वजनिक उपक्रम.


Back to top button
Don`t copy text!