दैनिक स्थैर्य । दि. ०७ जुलै २०२२ । सातारा । महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी होती ती आमच्यासाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी याविषयी पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या मात्र त्यांनी आमचे म्हणणे फारसे गांभीर्याने घेतले नाही दोन अडीच वर्षात आमच्या आमदारांना आणि शिवसैनिकांना त्रास झाला सर्वकाही अगदी सहनशीलतेच्या पलीकडे गेल्याने आम्ही चाळीस आमदारांनी एकत्रित उठाव केला यापुढे सातारा जिल्ह्यातील चार आमदारांची संख्या निश्चित वाढवून दाखवू शिंदे गट आणि भाजप ही युती नैसर्गिक आहे आणि पुढील अडीच वर्षात महाराष्ट्राचा निश्चित विकास होणार असे ठाम प्रतिपादन पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांनी केले.
माजी मंत्री शंभूराजे आज सातारा जिल्ह्यात दाखल झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ते पाटण मतदारसंघात मदतीसाठी दाखल झाले आहेत त्या पार्श्वभूमीवर देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, ” आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आम्ही मतदारसंघातील जनतेच्या मदतीसाठी दाखल झालो आहोत . आमच्या 40 आमदारांचे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात स्वागत होत आहे .त्यामुळे शिवसैनिक आमच्या सोबत आहेत हे स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला . आम्ही गुवाहाटीला 40 रेडे पाठवलेत अशी संजय राऊत यांनी टीका केली होती या टीके विषयी बोलताना ते म्हणाले 40 रेडे काय करू शकतात याची प्रायश्चित्त त्यांना भोगावे लागले आहे . त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देणे योग्य वाटत नाही नारायण राणेंनी आमच्याबद्दल सद भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असे देसाई यांनी सांगितले . गुवाहाटी ला जाण्यापेक्षा तुम्ही खासदार उदयनराजेंच्या जल मंदिरात का आला नाही ? या प्रश्नावर ते म्हणाले आम्ही मुंबईत आलो नाही तर जलमंदिरला कशाला येऊ जलमंदिर चे नेते हे आमचे मित्र असून यापुढे ते आमचे मित्रच राहतील . आगामी अडीच वर्षाच्या काळात जिल्ह्याचा धडाकेबाज विकास करण्याचे निश्चित केले असून जिल्ह्याने फक्त मागायचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यायचे इतकेच काय ते शिल्लक आहे असे देसाई म्हणाले.
जिल्ह्यातील शिवसेना व भाजपचे चारही आमदार व खासदार आम्ही एकत्र काम करणार आहोत पालकमंत्री पदाबाबत विचारले असता ते म्हणाले मी कोणतेही मंत्रीपद मागितलेले नाही काही कारणानिमित्त मी मुंबईत होतो काही आमदार मंत्रिपदासाठी विनंती करत होते पण मी साहेबांनी याविषयी काही बोललेलो नाही मला मंत्री करणार की पदोन्नती देणार पालकमंत्री करणार का या कोणत्याही विषयावर माझी एकाही ओळीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली नाही असे देसाई यांनी स्पष्ट केले महाविकास आघाडीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले ज्यांच्या विरोधात आम्ही मते मागितली होती त्यांच्याबरोबरच मांडीला मांडी लावून सत्तेत बसणे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता पण साहेबांनी ही आघाडी स्वीकारली त्यामुळे आमची अडचण झाली मात्र आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये नामधारीच असे होतो आमच्या अधिकार वृद्धी संदर्भातही आम्ही बोललो होतो मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने बघण्यात आले नाही आमच्या मतदारसंघातील आम्ही सुचवलेल्या कामांचेही राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांनी उद्घाटन केली हा हस्तक्षेप ही आम्हाला उघड्या डोळ्यांनी पहावा लागला . पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही शिवसैनिकांना प्रचंड त्रास झाला सर्व बाबी सहनशीलतेच्या पलीकडे गेल्याने आम्ही उठावाचा निर्णय घेतला आगामी काळात पुढील अडीच वर्ष शिवसेना-भाजप आम्ही एकत्र राहून सातारा जिल्ह्यातील चार आमदारांची संख्या नक्की वाढवू असा विश्वास यांनी व्यक्त केला.