
दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२३ । मुंबई । प्रतिमहिना जवळपास १० लाख रोजगारांवर आधारित भारतातील नियुक्तीचे सर्वात अचूक परिमाण देणा-या नोकरी जॉबस्पीक निर्देशांकानुसार जून २०२३ मध्ये आयटी क्षेत्रातील रोजगार भरतीमध्ये घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर ऑइल अँड गॅस, रिअल इस्टेट आणि फार्मा क्षेत्रातील नोक-यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या क्षेत्रात नोकरभरतीमध्ये अनुक्रमे ४० टक्के, १७ टक्के आणि १४ टक्के वाढ झाली आहे.
भारतातील व्हाइट-कॉलर नियुक्ती जून २०२३ मध्ये उत्तम राहिली. भरतीच्या जाहिरातींची संख्या २७९५ झाली. गेल्यावर्षी ती २८७८ इतकी होती. मासिक आधारावर भरतीच्या जाहिराती २ टक्के घटल्या आहेत. टेक क्षेत्र व मेट्रो शहरांमधील व्हाइट कॉलर रोजगारांची संख्या कमी झाली, तर विशेषत: नॉन-मेट्रो शहरामधील रिअल इस्टेट व ऊर्जा क्षेत्रांतील रोजगारांच्या संख्येने या घटवर मात करत रोजगार बाजारपेठ स्थिर ठेवली.
आयटी क्षेत्रात भरती घटली:
आयटी उद्योगामधील नियुक्ती चिंतेचा विषय म्हणून कायम राहिला, जेथे गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत नवीन रोजगारांमध्ये ३१ टक्क्यांची घट झाली. नियुक्तीमधील ही घट प्रामुख्याने सर्व प्रकारच्या आयटी कंपन्यांमध्ये दिसण्यात आली, ज्यामध्ये जागतिक टेक कंपन्या, मोठ्या आयटी सर्विस कंपन्या, तंत्रज्ञान-केंद्रित स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न्सचा समावेश होता. सर्व मेट्रो व नॉन-मेट्रो शहरांतील नियुक्तीमध्ये घट झाली, जेथे बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई व पुणे यांसारख्या आयटीवर अवलंबून असलेल्या मेट्रो शहरांना मोठा फटका बसला. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स व सिस्टम अॅनालिस्ट्स यांसारख्या पूर्वापार पदांमध्ये घट दिसण्यात आली, तर सायबरसिक्युरिटी अॅनालिस्ट्स व एआय स्पेशालिस्ट्स यांसारख्या सर्वोत्तम पदांनी सकारात्मक नियुक्ती ट्रेण्ड्स दाखवले, ज्यामुळे इतर सर्वात टेक पदांसाठी नकारात्मक ट्रेण्ड कमी झाला.
ऑईल अॅण्ड गॅस, रिअल इस्टेट आणि फार्मा क्षेत्रांची उंच भरारी:
ऑईल अॅण्ड गॅस क्षेत्रातील रोजगारांमध्ये वाढ होण्याचे श्रेय श्रेय जलद रिफायनरी विस्तारीकरण आणि वाढत्या देशांतर्गत व निर्यात मागणीची पूर्तता करण्यासाठी सहाय्यक पदांना जाते. प्रामुख्याने अहमदाबाद, मुंबई व दिल्ली एनसीआर येथे प्रमुख पदांसाठी अधिक नियुक्ती दिसण्यात येत आहे, ज्यामध्ये एक्स्प्लोरेशन इंजीनिअर्स, रिफायनरी ऑपरेशन्स मॅनेजर्स आणि हेल्थ, सेफ्टी अॅण्ड एन्व्हायरोन्मेंट स्पेशालिस्ट्स यांचा समावेश आहे. या क्षेत्रातील नियुक्तीमध्ये मध्यम-स्तरीय अनुभव असलेल्या व्यावसायिकांना प्राधान्य देण्यात आले.
रिअल इस्टेट क्षेत्राने गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत नवीन रोजगारांमध्ये १७ टक्के वाढ करत आपली यशोगाथा कायम ठेवली. पायाभूत सुविधा विकास आणि व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये वाढीसह मुंबई व चेन्नई प्रॉपर्टी अप्रेझर्स, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजर्स आणि रिअल इस्टेट कन्सल्टण्ट्स यांसारख्या पदांसाठी प्रमुख रोजगार हब्स ठरले.
तसेच, फार्मा क्षेत्राने गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत नवीन रोजगारांमध्ये १४ टक्क्यांची वाढ केली. औषध विभागामध्ये स्थिर आरअॅण्डडी गुंतवणूकांमुळे चालना मिळत अहमदाबाद, चेन्नई व पुणे बायोटेक्नॉलॉजिस्ट्स, क्लिनिकल रिसर्च अॅनालिस्ट्स व क्वॉलिटी अशुरन्स स्पेशालिस्ट्ससाठी पसंतीचे गंतव्य म्हणून उदयास आले.
ऑटोमोबाइल, हॉस्पिटॅलिटी व बँकिंग या इतर काही क्षेत्रांमध्ये गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत नवीन रोजगारांमध्ये अनुक्रमे १२ टक्के, ११ टक्के व ११ टक्के वाढीसह सकारात्मक नियुक्ती भावना दिसण्यात आली.
नोकरीडॉटकॉमचे मुख्य व्यवसाय अधिकारी पवन गोयल म्हणाले, ‘‘भारताच्या व्हाइट कॉलर रोजगार बाजारपेठेत आमूलाग्र बदल दिसण्यात येत आहे. दीर्घकाळापासून टेक क्षेत्रातील आणि अव्वल मेट्रो शहरांमधील रोजगार व्हाइट कॉलर रोजगारामध्ये वाढ होण्याकरिता प्रमुख स्रोत राहिले आहेत. नुकतेच रिअल इस्टेट, ऑईल अॅण्ड गॅस, फार्मा आणि बीएफएसआय यांसारख्या उदयोन्मुख विभागांमधील रोजगार हे रोजगार वाढीसाठी मोठे योगदानकर्ते म्हणून उदयास आले आहेत.’’