दैनिक स्थैर्य । दि. १५ नोव्हेम्बर २०२२ । पुणे । पुणे येथे कॉलेजचे प्राचार्य मेजर थॉमसकॅंडी यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन, महात्मा फुले यांचा पुणे विश्रामबाग येथे सरदार व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत दिनांक १६ नोव्हेंबर १८५२ रोजी शालजोडी देऊन सत्कार केला या दिनाच्या १७० व्या संस्मरणीय दिनाचे औचित्य.सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्ष, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शतकोत्तर रौप्य महोत्सव स्मृती वर्ष, राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष आणि स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने सामाजिक , विधायक, शैक्षणिक, राजकिय तसेच विविध क्षेत्रातील विशेष उल्लेखणीय कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव म्हणून सन्मान युवा मनाचा,गौरव फुले विचारांचा, “महात्मा फुले समाजिक पुरस्कार 2022” प्रदान सोहळा रविवार दि.13 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाला.
यामध्ये पुरस्कार कामगार नेते कैलास पासलकर, ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नितिन बोराटे, सत्यशोधक विवाह दाम्पत्य शेखर मगर व सौ हर्षदा मगर, कामगार नेते दिपकभाऊ गायकवाड, ओबीसी जनमोर्चा समन्वयक मृणाल ढोले पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अदिती निकम, सद्गुरू सेवा प्रतिष्ठाणचे सचिन म्हसे यांना सत्यशोधक रघुनाथ ढोक , डॉ.सुरेश उबाळे व इतर मान्यवराच्या शुभहस्ते शाल , स्मृतिचिन्ह , गौरव सन्मानपत्र, व ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमा साठी अध्यक्षस्थानी फुले एज्युकेशनचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक, प्रमुख पाहुणे म्हात्मा फुले कृषी विद्यापीठ चे कृषी संशोधक डॉ सुरेश उबाळे, अमृतराव काळोखे, रोहिणी रासकर, उमा रासकर, सुनीता भगत, प्रावीण महाजन, सुनील नलवडे, हरीश ओव्हाळ, उत्तम मोरे, राजाभाऊ पायगुडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज, ,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करून करण्यात आला.
यावेळी डॉ. उबाळे यांनी मानवाने कृषी क्षेत्रात कशी कशी प्रगती केली आणि पुढे महात्मा फुले यांनी शेतीला प्रगत करून शेतकऱ्याचा आसूड ,गुलामगिरी, व इतर ग्रंथ लिहून महिला ही जननी ओळखून त्यांचे साठी प्रथम शाळा सुरू केल्याची मौलिक माहिती दिली.
तर रघुनाथ ढोक म्हणाले की महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक लिहून कोणत्याही कार्यात मध्यस्थी म्हणून भटजीची आवश्यकता नाही. त्यामुळे आपण सर्वांनी काळाची गरज ओळखून हे विज्ञान युग असल्याने अंधश्रध्दा कर्मकांड याला तिलांजली देऊन सत्यशोधक पदधतीप्रमाणे प्रमाणे विवाह व इतर कार्य करावेत आणि विवाह प्रसंगी अक्षता म्हणून फुले वापरावी असा देखील सल्ला दिला.
याप्रसंगी सौ पल्लवी मारकड,सौ गौरी पिंगळे, सौ सपना माळी,अलका गुंजाळ, डॉ प्रमिला तलवाडकर,विश्वनाथ गायकवाड , कुंदन काळे, यांचा विशेष सन्मान केला. कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी महात्मा फुले विचार अभियान संयोजक विकास शिंदे आणि पी एम पीएल राष्ट्रवादी कामगार युनियन संघटनेचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे स्वागत आणि सुजन फाऊंडेशनचे विविध उपक्रम विषयी माहिती संयोजक अजित जाधव यांनी दिली तर सूत्रसंचालन श्री योगेश चौधरी यांनी केले, आभार उत्तमराव मोरे यांनी मानले.