रेडेघाटाचे काम पूर्ण करा; आळजापूर ग्रामस्थांची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 11 डिसेंबर 2024 | फलटण | आळजापूर गाव हे आता औद्योगिकीकरणाचे गाव म्हणून पुढे येत आहे. गावात विविध नवीन व्यवसाय उद्योगात वाढ होत आहे. त्यामुळे त्यासाठी चांगल्या दळणवळण व रस्त्यांची आवश्यकता आहे. त्यातूनच आळजापूर गावातून कोरेगाव तालुक्यास जोडण्याचा एक मार्ग आहे. जुन्या काळात त्याठिकाणाहून ये-जा सुरू होती. परंतु तो रेडे घाट हा डोंगरभाग असल्याने कालांतराने जाणे – येणे वनविभागाच्या हद्दीत असल्याने बंद झालेले आहे. तसेच गेले 30-40 वर्षे याठिकाणी विविध लोकप्रतिनीधी यांनी भेटी दिल्या. परंतु प्रत्यक्षात काम कधीच सुरू झालेले नाही. तरी रेडे घाटाचे कामकाज तातडीने सुरु करावे अशी मागणी आळजापूर ग्रामस्थांच्यावतीने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

केंद्रात व राज्यामध्ये महायुतीचे सरकार असल्याने रेडे घाट अत्यंत आळजापूर पंचक्रोशीच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आपल्या माध्यमातून पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लागल्याने कोरेगावहून रेडे घाटातून जाणारी लोणंद बाजारपेठेस वाहतुक सोपी होईल. तसेच गावात यामुळे उद्योग व्यवसाय सुरू होवून नवीन रोजगार निर्मिती होईल. तसेच या रेडे घाटामुळे कोरेगावला जाणारे अंतर कमी होणार आहे. त्यामुळेच कोरेगाव बाजूने रस्त्याचे काम सुरू आहे. तरी फलटण बाजुने रस्ता पुर्ण करण्यासाठी या घाटाचे काम पुर्ण होणे गरजेचे आहे. तरी आपल्या माध्यमातून या कामास आवश्यक निधी प्राप्त होवून काम लवकरात लवकर पुर्ण व्हावे अशी मागणी आळजापूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदन देताना भाजपचे ज्येष्ठ नेते विलासराव नलवडे, जयवंत केंजळे, राजेंद्र नलवडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक व युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!