दैनिक स्थैर्य l २२ मे २०२२ l फलटण l अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती फलटण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवले आहे. कोणत्याही महापुरुषांना जातीच्या चौकटीत अडकवून ठेवणे चुकीचेच आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं कर्तृत्व हे एका जातीपुरते मर्यादित नसून समस्त हिंदुस्तान मध्ये हिंदुत्व टिकवण्याचं काम कोणी केला असेल तर ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनीच त्यांनी त्यांनी जे आपल्या कार्यकाळात काम केलं ते प्रत्येक भारतातील जाती समूहांना धर्मांना एकत्र आणि डोळ्यासमोर ठेवूनच काम केलेला आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात लोकांच्या हाताला रोजगार शेतीसाठी काम तसेच देशातील सर्व मंदिरांचे जीर्णोद्धार घाट धर्म मंदिरे बांधण्याचं काम केलं ते एका जातीसाठी नव्हे तर ते समस्त हिंदुस्थान अठरापगड जाती जमाती आणि बहुजन समाजासाठी केलेला आहे. अशा या महान राज्यकर्त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना फक्त जण जर जातीतच ठेवणं चुकीचं आहे. फलटण तालुक्यातील सर्व बहुजन समाजाने राज मातेला जातीच्या चौकटीत न अडकवता फलटणचे निंबाळकर संस्थानाचे श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी नियुक्त करून राजमाता या एकाच जातीच्या नव्हे तर सर्व समाजाच्या देशाला आदर्शवत अशा महाराणी असून फलटण तालुक्यातून धनगर समाजाने नवा पायंडा पाडला आहे.
5 जून 2022 च्या जयंती महोत्सवाला फलटण तालुक्यातील सर्व अठरापगड जाती जमाती लोक लोक बहुजन समाजातील लोक या जयंती महोत्सव एकत्र येऊन साजरा करतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक तथा जयंती महोत्सवाचे प्रवक्ते संतोष बिचुकले यांनी आपले मत व्यक्त केले.