पालिका प्रशासनावर सत्ताधार्‍यांचा अंकुश नसल्याचे स्पष्ट – अमोल मोहिते

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


पालिकेच्या इतिहासाला काळिमा ङ्गासणार्‍या घटनेचा निषेध

स्थैर्य, सातारा, दि. 09 :  सातारा पालिका ही सातारकरांची नव्हे तर, मनमानी करणार्‍या अधिकारी आणि कर्मचार्‍यांची आहे हे अनेकदा सिध्द झाले आहे. सत्ताधार्‍यांचा प्रशासनावर अंकुश नसल्यानेच लाचखोरीसारखा निंदनीय प्रकार घडला असून पालिकेच्या गौरवशाली इतिहासाला काळीमा ङ्गासला गेला आहे. त्याचा निषेध करतानाच सातारकरांच्या हितासाठी सत्ताधार्‍यांनी पालिका प्रशासनावर अंकुश ठेवणे आवश्यक आहे, असे मत नविआचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांनी व्यक्त केले आहे.

सातारा पालिकेच्या इतिहासात कधी घडला नाही असा प्रकार काल घडला आहे. उमु‘याधिकारी संचित धुमाळ, आरोग्य निरिक्षक गणेश टोपे, प्रवीण यादव आणि कायगुडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. सातारा पालिकेतच लाच घेताना वरिष्ठ अधिकारी रंगेहात सापडतात हे कशाचे धोतक आहे. सत्ताधारी सातारा विकास आघाडीचा प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. गेल्या साडेतीन वर्षांपासून सातारा पालिकेत अधिकारी आणि कर्मचार्‍यांची मनमानी सुरु आहे. सत्ताधारी अंतर्गत गटबाजी, गटतट यामध्येच अडकून पडले असल्याचे अनेकदा सिध्द झाले आहे. सातारकरांनी नविआला विरोधात बसण्याचा कौल दिला. तो मान्य करुन नगर विकास आघाडी सक्षम विरोधकाची भूमिका बजावत आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून चुकीच्या गोष्टींना वेळोवेळी कठोर विरोध तर चांगल्या कामाला पाठिंबा देत नविआ नेहमीच प्रशासनाला वेसण घालण्याचा प्रयत्न करत आली आहे. जिल्हाधिकारी, सर्वसाधारण सभा यातून नविआची भुमिका सातत्याने स्पष्ट झाली असून यापुढेही चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. 

सातारा पालिका ही सातारकरांची मातृसंस्था आहे, याचा विसर सत्ताधार्‍यांना पडला आहे. सत्ताधार्‍यांना याचे भान नसल्यानेच पालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मनमानी करुन, नको त्या उचापती करत आहेत. किमान आतातरी सत्ताधार्‍यांनी आपसातील मतभेद आणि गटबाजी विसरुन सातारकरांच्या हितासाठी पालिकेचा कारभार लोकाभिमुख करावा आणि प्रशासनावर अंकुश ठेवावा, जेणेकरुन लाचखोरीसारखे लाजीरवाणे आणि पालिकेच्या इतिहासाला काळिमा ङ्गासणारे प्रकार घडणार नाहीत, असे मोहिते यांनी पत्रकात म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!