आत्मनो मुखदोषेण बध्यंते शुकसारिका: |
बकास्तत्र न बध्यंते मौनम् सर्वार्थसाधनम् ||
अर्थ : पोपट आणि साळुंक्या स्वत:च्या [गोड आवाजाच्या खरंतर गुण पण लोकांनी पकडण्याच्या दृष्टीने] दोषामुळे बंधनात पडतात. बगळे [काही आवाज करत नसल्यामुळे] पकडले जात नाहीत [म्हणून] मौन सर्व हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्याचे साधन आहे.
समाज्यात सुद्धा याच प्रकारे न्याय भेटतो. मौनात फार ताकत आहे. पण मौन बगळ्याच काय कामाचे. ते कायमचे धोक्याचे असते. आपण सतत सावध रहावे. आजूबाजूला बळी , बंधनात, जाळ्यात गोड आवाजाचे अडकतात. त्यात त्याचा दोष नाही. फक्त अंतरंग बाह्यरंग हेच समजून घ्यावे. साध्या समाज्यात बाह्यरंगालाच भाळणारे दिसून येतात.
मौनात सगळं मिळविण्याची ताकत असली तरी त्याच्या जागा समजून घ्यावी. सृष्ट बाजूने मौन फार अनमोल ठरते. ब-याच समस्या ह्या मौनातील शहाणपणाने सोडविल्या जातात. तसंच दृष्ट बाजूने मौनाने कौल तर ख-याला न्याय भेटत नाही. त्यासाठी आपलं बोलणं हे मौनातील चांगुलपणाच असावं. तसंच ते हितकारक, उपकारक, कृतज्ञता पूर्वक असावे.
आपल्या मौनाने एक वेळ भलं नाही झालं तरीसुद्धा कुणाचं वाईटपणा घेऊ नये. धोकेबाज मौनापरीस बोलकं बरं. आपला कौल बोलकं असू नायतर मौन हितकारकच असावं. मौनाने सर्व साध्य होतं. पण ते आपल्या हिताच, स्वार्थाच काय कामाचं. आपण समाज्याच देणं लागतो. या भावनेतून आपण जागरूक राहून सतत वाटचाल केल्यास नक्कीच दिस चांगले येतील.
मौन सुद्धा बोलकं अन् भलेपणाच असावं
आपलाच साधक – प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१