समर्थ नगर व करंडी क्षेत्रात सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आदेश जारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 4 : सातारा तालुक्यातील मौजे समर्थ नगर व मौजे करंडी ता. जि. सातारा क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने.  या क्षेत्रात  पुढील आदेशाप्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा उपविभाग, सातारा मिनाज मुल्ला यांनी सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत.

सातारा तालुक्यातील मौजे समर्थ नगर ता.जि.सातारा क्षेत्राची सीमारेषा पुढीलप्रमाणे राहील. येण्याचा मार्ग नागेश रविंद्र सर्वगोड, जाण्याचा मार्ग, समर्थ हौसिंग सोसायटी,समर्थ नगर, सीमा रेषा- पूर्वेस रुक्मिणी हणमंत आपटे, गणेश क्लिनिक विजयनगरकडे जाणारा रस्ता, पश्चिमेस- श्रीकांत बबनराव जाधव,गणेश मिनी बझार देगावं फाटा, दक्षिणेला गुलबानु रशीद खान  मारुती मंदिर चौक, मुख्य स्थळ नागेश रविंद्र सर्वगोड घर. क्र. 4.

सातारा तालुक्यातील मौजे करंडी ता.जि.सातारा क्षेत्राची सीमारेषा पुढीलप्रमाणे राहील. येण्याचा मार्ग मौजे करंडी ता. सातारा स्मशानभूमीकडून गावाकडे येणारा रस्ता,   जाण्याचा मार्ग – करंडी शिलोबकडे जाणारा रस्ता, सीमा रेषा- पूर्वेस बाळु पिराजी जाधव यांचे घर  पश्चिमेस- शशिकांत किसान जाधव यांचे घर, उत्तरेला – धनंजय सोनेराम जाधव यांचे घर. दक्षिणेला- शिवाजी मारुती देशमुख यांचे घर. मुख्य स्थळ करंडी मागासवर्गीय वस्ती घर नं7 अ.

त्यानुसार बाधित क्षेत्रातील आपत्कालीन व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्याकरीता अन्य व्यक्तींना संबंधित प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेल्या क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा व वस्तू पुरवठा करण्याकरीताची वेळ ही जिल्हा दंडाधिकारी यांनी यापूर्वीच दिलेल्या आदेशाप्रमाणे राहील.  या परिसरात  जीवनावश्यक वस्तुंचा, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालय व  व्यक्तींना, व त्यांच्या वाहनांना यामधून वगळण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तु व सेवा (दुध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळे व भाजीपाला इ.) यांच्या वाहतूकीसाठी कोणतेही निर्बंध नसून त्यासाठी वाहतूक पास उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा यांच्याकडे उपलब्ध होतील. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दुध, भाजीपला, औषधे, किराणामाल इ. वस्तू घरपोच करण्यात याव्यात. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा.

या आदेशान्वये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे तसेच ग्रामपंचायतीचे अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असलेले सर्व कर्मचारी व त्यांची वाहने तसेच शासकीय व अन्य अत्यावश्यक सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना या आदेशानुसार वगळण्यात येत आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!