निवडणुक असलेल्या नगरपंचायत व ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात 20 ते 22 डिसेंबर या कालावधीत मद्य विक्री बंदी आदेश जारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या  पोट निवडणुका खुल्या, मुक्त व निर्भय वातारवरणात पार पाडण्यासाठी मतदान संपण्याच्या वेळेपूर्वीच्या 48 तासांमध्ये  लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी ) अन्वये  मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार निवडणुक कालावधीत अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.  दि. 20 डिसेंबर 2021  मतदानाच्या अगोदरचा दिवस व 21 डिसेंबर 2021 मतदानाच्या दिवशी अबकारी अनुज्ञप्ती असलेल्या संपूर्ण ग्रामपंचायत  व नगरपंचायत क्षेत्र. दि. 22 डिसेंबर 2021 मतमोजणीच्या दिवशी सायं. 5 वा. पर्यंत संपूर्ण ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात या कालावधीत मद्य विक्री पूर्णपणे बंद ठेवावयाची आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील  देशी/विदेशी मद्य व वाईन निर्माणी अनुज्ञप्तीधारक हे बंदच्या कालवधीत उत्पादन करु शकतील. परंतु, या कालावधीत कोरडा दिवस लागू असल्याने अनुज्ञप्तीधारकांना देशी/विदेशी मद्याचा पुरवठा करता येणार नाही.

या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांच्या विरुध्द कडक कारवाई करण्यात येइल.


Back to top button
Don`t copy text!