स्थैर्य,श्रीहरिकोटा, दि ७: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून शनिवारी रडार इमेजिंग उपग्रह EOS01ची लॉन्चिंग केली. PSLV-C49 रॉकेटद्वारे देशाच्या रडार इमेजिंग उपग्रहासोबतच 9 विदेश उपग्रह अंतराळ सोडण्यात आले. लॉन्चिंगच्या निश्चित वेळेत (3 वाजून 2 मिनिटे) 10 मिनिटे उशिरा झाला.
यावर्षी ही इस्त्रोची पहिली लाँचिंग होती. याचवर्षी 17 जानेवारी रोजी ISRO च्या GSAT उपग्रह अंतराळ सोडण्यात आला होता. मात्र ही लॉन्चिंग फ्रेंच गुयाना येथून केली होती. ISRO चे चेअरमन डॉ. के सिवन यांनी EOS01च्या यशस्वी प्रक्षेपणावर ते म्हणाले की, दिवाळीआधीच रॉकेट लॉन्च केले, खरा उत्सव आता सुरू होईल. आम्ही वर्क फ्रॉम होममध्ये अंतराळाशी संबंधित काही गोष्टी करू शकत नाहीत. आपला प्रत्येक इंजीनिअर प्रयोगशाळेत उपस्थित असतो. जेव्हा आपण एखाद्या मोहिमेविषयी चर्चा करत तेव्हा प्रत्येक तंत्रज्ञ, कर्मचारी सोबत काम करतात.
रात्री सैन्य पाळत ठेवता येईल
रडार इमेजिंग उपग्रहाचा सिंथेटिक अपरेचर रडार ढगांच्या आरपारही पाहू शकतो. हा दिवस-रात्र आणि प्रत्येक वातावरणात फोटो घेऊ शकतो. याद्वारे आकाशातून शत्रू राष्ट्रांच्या हालचाली टिपण्यास मदत होणार आहे. यासह, शेती-वनीकरण मातीतील ओलावा शोधणे आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये देखील याची मदत होईल.
मोदी म्हणाले- कोरोनाची आव्हाने असूनही आमच्या शास्त्रज्ञांनी वेळेवर काम केले
चंद्रयान -2 नंतर चौथे आणि इस्रोकडून तिसरे प्रक्षेपण
मिशन | तारीख | लॉन्चिंग स्टेशन |
Chandrayaan-2 | 22 जुलै | ISRO |
Cartosat-3 | 27 नोव्हेंबर 2019 | ISRO |
RISAT-4BR1 | 11 डिसेंबर 2019 | ISRO |
GSAT-30 | 17 जानेवारी 2020 | फ्रेंच गुयाना |
EOS01 | 7 नोव्हेंबर 2020 | ISRO |
शनिवारच्या लॉन्चिंगसोबत ISROच्या विदेश उपग्रह पाठवण्याचा आकडा 328 झाला आहे. हे ISROचे 51 वी मोहिम होती. ISRO ने आपली वेबसाइट, यूट्यूब चॅनेल, फेसबुक आणि ट्विटर पेजवर या लॉन्चिंगचे LIVE प्रक्षेपण देखील केले.