
दैनिक स्थैर्य | दि. २७ डिसेंबर २०२४ | सातारा |
रयत शिक्षण संस्थेचे माजी मानद सचिव पै. इस्माईलसाहेब मोहम्मदसाहेब मुल्ला यांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त यावर्षीचा ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार २०२४’ वितरण सोहळा शुक्रवार, दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे स्थानिक शाखांच्या वतीने आयोजित केलेला होता; परंतु देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झाल्यामुळे केंद्र शासनाने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केल्यामुळे हा पुरस्कार वितरण कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेकडून देण्यात आली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्याचा पुढील कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येईल, असेही रयत शिक्षण संस्थेने सांगितले आहे.