फलटणच्या शंकर मार्केटमध्ये बेवारस स्थितीत आढळलेल्या इसमाचा उपचारापूर्वीच मृत्यू


दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२४ | सातारा |
फलटण शहरातील शंकर मार्केट येथे एक अनोळखी पुरूष जातीचा इसम (वय अंदाजे ५० वर्ष) शनिवारी बेवारस स्थितीत मिळून आला होता. त्यास पोलिसांनी प्रथमोपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल केले असता तिथून पुढील उपचाराकरिता सिव्हील हॉस्पिटल, सातारा येथे केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी हा इसम उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले आहे.

या घटनेची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे करत आहेत.

दरम्यान, यातील मयत व्यक्तिबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही फलटण पोलिसांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!