इस्लामाबाद :कुलभूषण यांच्यासाठी त्रयस्थ वकील नियुक्तीस पाकिस्तानचा नकार, भारतीय वकिलाद्वारे बाजू मांडण्यातही नकारघंटा


 

स्थैर्य, दि.२७: भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशी वरील फेरविचार याचनेसाठी परदेशी वकील नेमण्याच्या भारताच्या मागणीस स्वीकारता येणार नसल्याचे पाकिस्तानने पुन्हा स्पष्ट केले. जाधव यांच्या फाशीचा निर्णय पाकिस्तानचे न्यायालय घेईल, असे पाकचे म्हणणे आहे. जाधव यांना फाशी होईल किंवा नाही या प्रश्नावर परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते जाहिर हाफिझ चारी माध्यमांना म्हणाले, आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक जबाबदारी सदस्य असल्याच्या नात्याने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण सन्मान करतो. या प्रकरणात निर्णय काय असेल, याचा मी अंदाज लावू शकत नाही. परंतु, या प्रकरणाचा संपूर्ण आढावा व फेरविचार केवळ पाकिस्तानच्या न्यायालयांकडून प्रदान केला जाऊ शकताे.

जाधव यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक भारतीय किंवा परदेशी वकील उपलब्ध करून देण्याच्या भारताच्या मागणीबाबत चारी म्हणाले, पाकिस्तानच्या कार्टा वकिलीचा परवाना असलेल्या वकिलांना जाधव यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे, ही बाब भारताला वारंवार कळल्याचा दावा त्यांनी केला. हा आदेश क्षेत्रासंबंधी अधिकारानुसार आहे. दुसरीकडे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने देखील एका निर्णयात असा निर्णय दिला हाेता. परदेशी वकील देशात वकिली करू शकत नाहीत. पाक प्रवक्ता म्हणाला, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाला प्रभावी करण्यासाठी भारत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. त्याचबराेबर पाकच्या न्यायालयास सहकार्य करायला हवे. जाधव यांच्यासाठी इस्लामाबादच्या हायकोर्टाकडे दाद मागणारे देखील हेच पाकिस्तानचे सरकार असल्याचे चारी यांचे म्हणणे आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!