
परवाच एका मित्राचा एकदम घाबऱ्याघुबऱ्या आवाजात कॉल आला की, “डीडी, मला संशय आहे की माझ व्हाट्स अप हॅक झालं असावं.”
मी त्याला त्याची कारणे विचारली तेव्हा कळलं की काही संशयास्पद असं त्याला जाणवत आहे. त्याला आधी शांत बोलून रिलॅक्स केले आणि त्याला जो उपाय सांगितला… तोच तुम्हाला इथं सांगतोय. न जाणो तुम्हाला पण याची भविष्यात गरज पडू शकते.
तर भविष्यातला “उद्याचा” धोका तुम्ही “आजच” कायमचा रोखू शकता.
तर यासाठी काय करायचे ??
फार सोपी प्रोसिजर आहे !
1. तुमच्या WhatsApp वर जा
2. तिथं उजव्या बाजूला तीन डॉट्स असतात तिथं जाऊन त्यात सेटिंग्जवर जा, त्याला क्लिक करा.
3. तिथं गेल्यावर “Privacy” वर क्लिक करा
4. त्यानंतर तिथं थोडं खाली जाऊन स्क्रोल करत “Advanced” हे ऑप्शन पहा आणि त्यावर क्लिक करा.
5. तिथं आल्यावर तिथं दोन ऑप्शन दिसतील. “Protect IP address in calls” आणि “Disable link previews” तर या दोन्हीला क्लिक करा. म्हणजे ऑन करा.
त्यानंतर बॅक बॅक करत बाहेर या. झालं तुमचं सेटिंग ओके !!
एकदा का तुम्ही हे केल्यावर, हॅकर्स तुमचे फोन हॅक करू शकत नाहीत कारण तुमचा IP address आता संरक्षित आहे. एकदा तुम्ही तुमचा आयपी ऍड्रेस व्हॉट्सॲपमध्ये सुरक्षित केला की, तुमचे व्हॉट्सॲप तसेच व्हाट्स अप च्या माध्यमातून फोनही हॅक होण्याची शक्यता बरीच कमी होते.
तेव्हा मंडळी… सावध राहा…. सुरक्षित राहा !
©️ ®️ डॉ. धनंजय देशपांडे (DD)
ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर आणि
HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State