रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीची ही योग्य वेळ आहे का?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.३१: एंजेल ब्रोकिंग लिमिटेचे रिसर्च असोसिएट श्री यश गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये मागील ३ महिन्यांत मोठे दृढीकरण पाहिले आहे. निफ्टीमध्ये या स्टॉकची कामगिरी खराब राहिली आहे. मागील ३ महिन्यांत निफ्टीने ९०० अंकांची वृद्धी घेतली. तर रिलायन्स इंडस्ट्री हा निफ्टीत सर्वाधिक वजनाचा स्टॉक असूनही रिलायन्सने २% नी सुधारणा केली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमोडिटीची किंमत वेगाने वाढत आहे. त्याचप्रमाणे पेट्रोकेमिकल उत्पादनांचे दरही वाढत आहेत. या कंपनीच्या अहवालानुसार, सर्व पेट्रोकेमिकल उत्पादनांचे वार्षिक दर, पुढील काही तिमाहीत ईबीआयटीडीए मार्जिनसह सुधारतील. बीपीसीएल निर्गुंतवणुकीबाबत बाजारातील बातमीनुसार, सरकार बीपीसीएल लिमिटेडमधील ५२% भागीदारी विक्री करण्यासाठी एफडीआय नियम आणि नियामकांमध्ये काही शिथिलता देऊ शकते. रिलायन्स इंडस्ट्रीसाठी कोणतीही सकारात्मक बातमी सकारात्मक ठरेल.

आम्ही आशा करतो की, हा स्टॉक वरील बाजूने गती घेईल आणि येत्या आठवड्यात २२००-२२५० च्या पातळीला स्पर्श करेल.


Back to top button
Don`t copy text!