स्थैर्य, कणकवली, दि.१४: हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मुलगा आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. त्यांचा नातू मंत्री आहे. अशावेळी राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन करावे लागते ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. सरकारचे डोके खरेच ठिकाणावर आहे काय, हा प्रश्न आज भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने विचारत आहोत. मटका, जुगार, बियर बार हे सर्व चालू आणि मंदिरे, वाचनालये बंद. हे नशा करणा-या लोकांचे सरकार आहे काय, असा संतप्त सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला.
राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी कणकवली येथे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कोरोना काळात गेल्या नऊ महिन्यात राज्याची पूर्ण लाज घालविली आहे. आज मंदिर उघडण्यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागते यापेक्षा मोठे अपयश नाही. शिवसेनेची काही मंडळीच मटका, जुगार रात्रभर बसून खेळतात, मात्र त्यांना काही बंधन नाही. कोण त्यांना रोखत नाही, मात्र मंदिर उघडण्यास मात्र बंदी आहे. आज आम्ही मंदिरात जाऊन आरती केली तर सर्वांवर केसेस टाकल्या जातील. राज्यातले तरुण मंत्री पार्ट्या करतात, त्यामुळे हत्या होतात, महिलांवर बलात्कार होतात. त्यावर कोणताही अंकुश नाही, असा आरोपही नितेश राणे यांनी केला.