
स्थैर्य, मुंबई, दि. १२: आयपीएल 2021 चा लिलाव येत्या 18 फेब्रुवारीला होत असून आयपीएलने 292 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यात ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श, न्यूझीलंडचा ऑलराउंडर कोरी अँडरसन आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोंलदाज मोर्ने मॉर्केलसह 17 नावांचा समावेश असून त्यांना शार्टलिस्ट केलेल्या यादीत घेण्यात आले आहे. या खेळाडूंची नावे ही फ्रेंचाइजच्या विनंतीवरुन सामील केली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, यात भारतीय संघाचा माजी वेगवान गोलदांज एस श्रीसंतला संधी मिळाली नाही. तर, दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाचे माजी विकेटकीपर सैयद किरमानी यांच्या 31 वर्षीय मुलाला जागा मिळाली आहे. सैयद्द किरमानी 1983 मध्ये विश्वकप जिंकलेल्या भारतीय संघाचे विकेटकीवर होते.
सादिक किरमानीला फक्त 2 वेळेस खेळण्याची संधी
माजी खेळाडू सैयद्द किरमानी यांचा मुलगा सादिक किरमानी विकेटकीपर फलदांज आहे. परंतू, घरच्या मैदानावर तो कर्नाटक संघासाठी फक्त दोन सामने खेळला असून त्यांनी आपला शेवटचा सामना 2015 मध्ये खेळला होता. टी-20 सामन्यामध्ये त्यांने शेवटचा सामना अडीच वर्षांपूर्वी 2018 मध्ये कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये खेळला होता.
एस. श्रीसंतची बेस प्राईस 75 लाख
आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेसाठी श्रीसंतने रजिस्टर केल होते. त्याने आपली बेस प्राइज 75 लाख रु ठेवली होती. 2013 च्या स्पॉट फिक्सिंगमध्ये नाव समारे आल्याने BCCI ने त्याच्यावर खेळण्यास आजीवन बंदी घातली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने नंतर ती आजीवन बंदी उठवली. परंतू आयपीएलच्या यादीत त्याला स्थान न मिळाल्यामुळे त्याच्या पुनरागमनाची शक्यता धुसर झाली आहे.
61 खेळाडूवंर लागू शकते बोली
आयपीएलच्या येणाऱ्या आगामी सत्रात 8 फ्रेंचाइजचे केवळ 61 स्लॉट असून त्यामध्ये 22 विदेशी खेळाडूंच्या जागा रिकाम्या आहेत. या खेळाडूंची निवड 1097 रजिस्टर खेळाडूच्या पुल शार्टलिस्टमधून केली असून, यात भारताचे 164 आणि बाकी देशाच्या 128 खेळाडूंच्या समावेश आहे.
10 खेळाडूंची बेस प्राईस 2 कोटी रूपये
यावर्षीच्या शार्टलिस्ट खेळाडूमध्ये 10 नाव असे आहे की, ज्यांची बेस प्राईस 2 कोटी रुपये असणार आहे. त्यामध्ये भारताचा हरभजन सिंग आणि केदार जाधवचा समावेश असून बाकी 8 खेळाडूंमध्ये ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ दोन्ही ऑस्ट्रेलिया, मोएन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लंकेट, जेसन रॉय, मार्क वुड सर्व इंग्लड आणि बांग्लादेशाचे ऑलराउंडर शाकिब अल हसन यांचा समावेश आहे. अगोदर यामध्ये सामील दक्षिण आफ्रिकाचे कोलिन इनग्रामचा आता समावेश नसणार.
कॅप्ड आतंरराष्ट्रीय खेळाडूने सुरू होईल बोली प्रक्रिया
आयपीएलने सर्व फ्रेंचाइजना सुचित केले आहे की लिलावाची प्रक्रिया 18 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेपासून कॅप्ड इंटरनॅशनल खेळाडू समक्ष होणार आहे. यामध्ये सर्वात अगोदर फलदांजवर बोली लावली जाणार असून त्यानंतर ऑलराउंडर, विकेटकीपर, फास्ट बॉलर आणि स्पिनरचा नंबर येणार आहे. अनकॅप्ड खेळाडूंसाठी पण या मार्गाचा अवलंब केला जाईल. आयपीएलने हे पण सांगितले आहे की 87 खेळाडू बोली लागल्यानंतर लिलावासाठी जोराने प्रक्रिया राबवली जाईल. यामध्ये सर्व अनरिप्रेजेंटेड आणि अनसोल्ड खेळाडूंवर बोली लावली जाईल.