फलटणमध्ये उद्यापासून निमंत्रित हॉकी स्पर्धेचे आयोजन; श्रीमंत रामराजेंच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटीच्या जिमखाना विभाग व क्रीडा समितीच्या माध्यमातून श्रीमंत मालोजीराजे स्मृती चषक निमंत्रित हॉकी स्पर्धेचे आयोजन उद्या दि. 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2022 पर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

फलटण येथील माजी आमदार स्व. श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुलावर श्रीमंत मालोजीराजे चषक निमंत्रित हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उद्या रविवार दि. 6 नोव्हेंबर 2022 रोजी क्रीडा संकुलावर विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू तथा उपआयुक्त राज्य कर धनंजय महाडिक व आमदार दीपक चव्हाण यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न होणार आहे.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून आठ सर्वोत्कृष्ट संघ सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडू हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. या स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे.

श्रीमंत मालोजीराजे स्मृती चषक हॉकी स्पर्धासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक अनिल चोरमले, सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.

या स्पर्धेसाठी श्रीमंत मालोजीराजे स्मृती चषक निमंत्रित हॉकी स्पर्धेचे आयोजकांकडून व फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे यांनी या क्रीडा स्पर्धेचा आनंद क्रीडा रसिकांनी घेण्याचे अवाहन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!