दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला गेलेल्या बिबी (ता. फलटण) येथील महिलेला अडवून तिचे दागिने हिसकावून पलायन करणारे चोरटे लोणंद पोलिसांनी जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी २ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोणंद पोलीस ठाणे हददीतील बिबी, ता. फलटण येथे दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी बिबी ते आळजापूर रस्त्याने मॉर्निंग वॉक करण्यासाठी जात असलेल्या महिलेला तीन अनोळखी इसमांनी मोटारसायकलवर येऊन अडवून तिच्या गळ्यातील, कानातील दागिने व दोन अंगठ्या असे दागिने हिसकावून नेल्याचा गुन्हा लोणंद पोलीस ठज्ञण्यात दाखल होताच सपोनि सुशील भोसले प्रभारी अधिकारी, व त्यांच्या टिमने बिबी येथे जाऊन चोरट्यांबाबत गावातील सी. सी. टी. व्ही. फुटेजच्या आधारे तसेच खबर्यांमार्फत घेतली.
या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे लोणंद पोलिसांनी पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून दोन आरोपींना पकडले. यावेळी आरोपींनी व त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांवर दगडफेक करून हल्ला केला होता.
या आरोपींना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर सदरचा गुन्हा कबुल केला. त्यांच्याकडून २,००,०००/- रुपये किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल व ७०,०००/- रुपये किंमतीची गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची मोटारसायकल असा एकूण २,७०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच त्यांनी व त्यांचा आणखी एक साथीदार यांनी लोणंद पेलीस ठाणे, आरोपींनी लोणंद तसेच इतर पोलीस ठाणे हददीत केलेल्या अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोउनि विशाल कदम, महिला पोउनि ज्योती चव्हाण, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.हवा. सर्जेराव सूळ, नाळे, नलवडे (जिविशा बीट), विजय पिसाळ, नितीन भोसले, विठ्ठल काळे, केतन लाळगे, गोविंद आंधळे, अंकुश कोळेकर, अभिजीत घनवट, संजय चव्हाण, जयवंत यादव, सिध्देश्वर वाघमोडे, भारती मदने, योगेश कुंभार, संजय बनकर, शिवशंकर तोटेवाड यांनी केली.