गुंतवणूकदारांची घोर निराशा; अदानी विल्मरची सवलतीत नोंदणी, मात्र त्यानंतर घेतला यू-टर्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । अदानी समूहातील अदानी विल्मरने आज ८ फेब्रुवारी २०२२ रोजी शेअर बाजारात प्रवेश केला. अदानी विल्मरचा शेअर इश्यू प्राईसच्या तुलनेत ९ रुपये सवलतीत सूचीबद्ध झाला. या सुमार नोंदणीनं मोठ्या फायद्याची स्वप्ने बाळगून असलेल्या गुंतवणूकदारांची सपशेल निराशा झाली. मात्र काही क्षणात त्याने तेजीची वाट धरली. सध्या तो २४९ रुपयांवर गेला आहे. त्यात ६ टक्के वाढ झाली.

ग्रे मार्केटमध्ये अदानी विल्मरच्या प्रिमीयममध्ये घसरण होत होती. मागणी कमी झाल्याने प्रिमीयममध्ये घसरण होत असल्याचे बोलले जात होते. प्रती शेअर २८ रुपये इतका प्रिमीयम खाली आला होता. प्रिमीयम कमी झाल्याने आता अदानी विल्मरचा शेअर इश्यू प्राईसच्या तुलनेत १० ते १५ टक्के वाढीसह सूचीबद्ध होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. सोमवारी भांडवली बाजारात मोठी पडझड झाली होती. त्यामुळे बाजारात नकारात्मक वातारण होते.

आयपीओसाठी कंपनीने प्रती शेअर २३० रुपये किंमत ठेवली आहे. त्यातुलनेत आज मंगळवारी अदानी विल्मरची २२१ रुपयांना नोंदणी झाली. इश्यू प्राईसच्या तुलनेत तो ३.९ टक्के कमी दराने सूचीबद्ध झाला. त्याने २४९ रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला आहे.

अदानी विल्मरकडून समभाग विक्रीसाठी बोली प्रक्रिया २७ जानेवारी रोजी सुरु झाली होती आणि ३१ जानेवारी २०२२ पर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. या योजनेत किमान ६५ इक्विटी शेअरसाठी अर्ज करता येणार होता. यासाठी प्रती शेअर २१८ ते २३० रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा ३.९२ पटीने सबस्क्राईब झाला. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठीचा राखीव हिस्सा ५६ पटीने सबस्क्राईब झाला.


Back to top button
Don`t copy text!