
दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑगस्ट २०२२ । मुंबई । अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील घटनेतील पोलीस अधिकारी संजय सानप यांची विभागीय चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पोलीस अधिकारी संजय सानप यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे या घटनेतील इम्रान कुरेशी यांच्याशी काही संबंध आहेत का? याची चौकशी केली जाईल. यामध्ये तथ्य आढळल्यास विशेष कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.