पांडे महल खरेदी व्यवहाराची तातडीने चौकशी करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, भंडारा, दि. 18 : जिल्ह्याची ओळख असलेल्या पांडे महल या ऐतिहासिक वास्तूच्या खरेदी-विक्री व्यवहाराची तपासणी तातडीने करुन पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्याच्या तहसीलदारांना दिल्या. खरेदी-विक्री व्यवहार चूकीचा झाला असल्यास रद्द  करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

पांडे महलच्या संरक्षण, संवर्धन व सौंदर्यीकरण कार्याला गती प्रदान करण्याबाबत मुख्यमंत्री सचिवालय नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार भंडारा अक्षय पोयाम, नगरपालिका मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, नगरपालिका प्रशासन अधिकारी सुधीर गवळी, पुरातत्व विभागाचे शांताराम केकडे, बहुमूल्य वास्तू संवर्धन व संरक्षण विकास समितीचे सदस्य विजय खंडेरा, डॉ. नितीन तुरसकर, ॲङ सुशील वंजारी, शितल तिवारी, विकास मदनकर, अजय मेश्राम, प्रतीक तांबोळी, वास्तुविशारद निकीता रामानी, डॉ. मधुरा राठोड व रविनाथ यावेळी उपस्थित होते.

ऐतिहासिक वास्तूचे महत्त्व लक्षात घेता पांडे महालाच्या खरेदी-विक्री व्यवहारात चुकीच्या पद्धतीचा वापर करण्यात आला. तसेच अवैध कागदपत्रे सादर करण्यात आली, असा आक्षेप समितीने यावेळी नोंदविला. यावर तहसीलदारांनी या व्यवहाराची पंधरा दिवसात चौकशी करावी, अशी  सूचना श्री. पटोले यांनी केली. या व्यवहारात चूक आढळल्यास तो व्यवहार रद्द करावा, असे ते म्हणाले. पांडे महल खरेदी व्यवहारात चूकीच्या पत्रव्यवहाराचा वापर झाल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला. यावर बोलताना श्री. पटोले म्हणाले, नगरपालिकेने या पत्रव्यवहाराची तातडीने चौकशी करावी.

पांडे महल सौंदर्यीकरणाचा आराखडा तातडीने तयार करण्याच्या सूचना श्री. पटोले यांनी पुरातत्व विभागाला दिल्या. पुरातत्व विभागाने नोटीफिकेशन काढून या कामाला गती द्यावी असे ते म्हणाले. यासाठी वास्तुविशारद  नेमावा असेही त्यांनी सांगितले. पुरातत्व विभागाने भंडारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू व गडकिल्ल्यांचा आढावा घेऊन विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!