टीबी संपवण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा; साताऱ्यात जागतिक क्षयरोग दिन विविध उपक्रमांनी साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२५ मार्च २०२२ । सातारा । जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सातारा शहरामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या वतीने गुरुवारी शहरातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . तसेच क्षयरोग निवारण दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी सर्वोत्तम उपचार करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. टीबी संपवण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा हे यंदाच्या वर्षाचे घोषवाक्य असल्याचे डॉक्टर अविनाश पाटील यांनी सांगितले.

सकाळी आठ वाजता जिल्हा रुग्णालय पोवई नाका ते राजवाडा व तेथून पुन्हा जिल्हा रुग्णालय या दरम्यान सकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . या रॅलीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . राधाकिसन पवार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दाखवला . डॉक्टर सचिन पाटील, डॉक्टर शरद जगताप ,डॉक्टर निलेश थोरात, डॉक्टर संजय साठे, अजिंक्य दिवेकर ,डॉक्टर क्रांती दयाळ, इत्यादी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांच्या हस्ते रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे व धन्वंतरीचे पूजन करण्यात आले .जिल्हा क्षयरोग अधिकारी अविनाश पाटील यांनी कार्यक्रमाच्या रूपरेषेसह प्रास्ताविक केले . यावेळी क्षयरोग दिनाची माहिती देताना अविनाश पाटील म्हणाले संपूर्ण जिल्ह्यामध्ये क्षयरोग जनजागरण मोहीम पंधरवडा राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र ही तपासणी मोहीम सुरू करण्यात येत आहे. सातारा शहरातील जिल्हा क्षयरोग केंद्र यांची मार्फत क्षयरोग निवारणाचे उपाय याची माहिती देणारी पत्रके आणि टोपी यांचे वाटप करण्यात आले. क्षयरोग जनजागरण विषय प्रतिज्ञाचे या वेळी वाचन करण्यात आले . जिल्हा उद्योग केंद्राच्या आवारात आरोग्य विषयक माहिती असणाऱ्या पोस्टर चे प्रदर्शन भरवण्यात आले होते डॉक्टर क्रांती दयाळ यांनी क्षयरोग विषयक माहिती यावेळी दिली. या स्पर्धेतील विजेत्यांना डॉक्टर अविनाश पाटील व क्रांती दयाळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!