लॉकडाऊनच्या काळातील अन्नदाता ‘राजेश बाहेती’ यांची परिचय केंद्राला भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, नवी दिल्ली, 1 : प्रसिद्ध उद्योजक राजेश बाहेती यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. श्री.बाहेती यांनी लॉकडाऊनच्या काळात जवळपास सव्वा दोन लाख लोकांना अन्नदान केले.

परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी बाहेती यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी गणेश रामदासी संचालक (माहिती), पत्रकार राजेंद्र वाघमारे उपस्थित होते.

मूळचे महाराष्ट्रातील पुण्याचे असणारे बाहेती यांचा दुबईमध्ये हॉटेल व्यवसाय आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आणि त्यांच्या  कुंटूबियांनी जवळपास सव्वा दोन लाख लोकांना नास्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण पोहोचविले. यामध्ये कोविड योध्दा, सर्वसामान्य नागरीक, रस्त्याच्या कडेला असणारे लोक, तसेच जवळच्या परिसरातील गाव पाड्यातील लोकांना अन्नदान केले.

यासह पुण्याजिल्ह्यातील दुर्गम  भागातील 17 हजार लोकांना रेशन किटही बाहेती यांनी दिली.

28 मार्च ते 31 मेपर्यंत सलग 66 दिवस बाहेती कुंटूबियांनी अन्नदानाचे कार्य केले. या कार्यात त्यांना त्यांच्या नातेवाईक आर्थिक मदत केली.

त्यांच्याकडे 10 शेल्टरची जबाबदारी सोपविली होती. या शेल्टरमध्ये गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, आणि दक्षिणेतील राज्यांमधील कामगार आणि त्यांचे कुंटूब होती. शेल्टरमध्ये तीन महिन्यांच्या बालकांपासून ते वयोवृध्द सर्वच वयोगटातील लोक होती. त्यांनी शेल्टरमध्ये असणाऱ्यांसाठी सणानुरूप गोड जेवणही दिले.

रस्त्यावरील गरोदर महिला आणि तिच्या कुंटूबाला दिलेला मदतीचा हात

आठवताना त्यांना सांगितले, सदर महिलेला योग्य इस्पितळात दाखल करून तीथे तिची प्रसूती झाली. हा अनुभव सांगताना केलेल्या मदतीचे समाधान असल्याचे बाहेती यांनी व्यक्त केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!