सेंच्युरी मॅट्रेसद्वारे ऑर्थोपेडिक फोम मॅट्रेसमध्ये स्लीपेबल्स बेड सादर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । मुंबई । नवोन्मेषकारी उत्पादनांच्या शर्यतीचे नेतृत्व करत, सेंच्युरी मॅट्रेस या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या मॅट्रेस ब्रॅण्डने बॉक्स ऑर्थोपेडिक फोम मॅट्रेसमध्ये स्लीपेबल्स बेड आणला आहे. स्लीपेबल्स हा सेंच्युरीचा ऑनलाइन ब्रॅण्ड असून तो आधीपासूनच फोम मॅट्रेसेस व स्प्रिंग मॅट्रेसेस ‘मॅट्रेसेस इन अ बॉक्स’ डिलिव्हरी प्रारूपात देऊ करतो.

स्लीपेबल्स ऑर्थोपेडिक फोम मॅट्रेसेस ६ इंच व ८ इंच अशा दोन प्रकारांत ‘मॅट्रेसेस इन अ बॉक्स’ डिलिव्हरी मॉडेलमध्ये उपलब्ध होईल. नवीन फोम मॅट्रेसेस सर्व नियमित सिंगल बेड व डबल बेड आकारमानांत उपलब्ध होतील. ग्राहकांच्या प्रतिक्रियेबद्दल ब्रॅण्ड आशावादी आहे, कारण स्लीपेबल्सच्या बोनेल स्प्रिंग मॅट्रेसेस व पॉकेट स्प्रिंग मॅट्रेसेस यांचे आघाडीच्या बाजारपेठेत भक्कम स्थान आहे.

सेंच्युरी मॅट्रेसचे कार्यकारी संचालक श्री. उत्तम मालानी म्हणाले, “ग्राहकांच्या बदलत्या गरजांना अनुकूल ठरावे म्हणून आम्ही या उत्पादनाचे नव्याने इंजिनीअरिंग केले आहे. या उत्पादनाचा गाभा सीएनसी कट कोंटुर फोम हा आहे. त्यामुळे हवा चांगल्या रितीने खेळती राहते आणि मॅट्रेसमधील तापमानाचे नियंत्रणही उत्तम होते. या मॅट्रेसचा अंशत: ताठ स्पर्श पाठीला व संपूर्ण शरीराला सुयोग्य आधार पुरवण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आला आहे. स्लीपेबल्सच्या फोम मॅट्रेसेसमध्ये आराम व आधार यांचा योग्य समतोल साधण्यात आला आहे. या मॅट्रेसवर बसून लोक दीर्घकाळ काम किंवा अभ्यास अगदी आरामात करू शकतात, पाठ किंवा शरीरावर याचा अजिबात परिणाम होत नाही.”

सेंच्युरीने आजपर्यंत उद्योगक्षेत्रात अनेक बाबी प्रथम केल्या आहेत, त्यातच आणखी एक भर म्हणून कंपनीने सेंच्युरी प्रोटेक्ट हे सूक्ष्मजंतूरोधक फीचर सर्व मॅट्रेस श्रेणींमध्ये आणले आहे. भारतात कॉपर जेल मेमरी फोमचा पायाही सेंच्युरीनेच घातला आहे. १०० टक्के पर्यावरणपूरक लहान मुलांची मॅट्रेस बेडी आणि भारतातील पहिली स्प्रिंग मॅट्रेस बॉक्स उत्पादनाच्या स्वरूपात बाजारात आणणारी पहिली कंपनी असल्याचा सेंच्युरीला अभिमान आहे. रेझिलिया झिप मॅट्रेस हे कंपनीचे उत्पादन आयुष्यभराच्या वॉरंटीसह येते. या मॅट्रेस ब्रॅण्डला भारतातील वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने नुकतीच स्टार एक्स्पोर्ट हाउस म्हणून मान्यता दिली आहे.

३० वर्षांहून अधिक दीर्घ वारसा व उत्पादन नवोन्मेषासह सेंच्युरी मॅट्रेसने गेल्या तीन वर्षांत ३० टक्क्यांहून अधिक वाढ साध्य केली आहे. ४५००हून अधिक मल्टि-ब्रॅण्ड आउटलेट्स व सुमारे ५०० ब्रॅण्ड स्टोअर्स यांच्यासह मॅट्रेसच्या या ब्रॅण्डचे रिटेल क्षेत्रात भक्कम स्थान आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू व ओडिशा या राज्यांमध्ये सेंच्युरी बाजारपेठेतील आघाडीचा ब्रॅण्ड आहे, तर केरळ, कर्नाटक व मध्य भारतातील बाजारपेठांमध्येही ब्रॅण्डचे स्थान भक्कम आहे.


Back to top button
Don`t copy text!