
दैनिक स्थैर्य । 17 एप्रिल 2025। फलटण । येथील मुधोजी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट व करिअर गायडन्स सेल च्या वतीने आयोजित केलेल्या रोजगार विषयक मेळाव्यामध्ये सह्याद्री इंडस्ट्रीज पुणे येथील कंपनी मार्फत वेगवेगळ्या 26 पदांसाठी मुलाखती आयोजित केल्या आहेत. त्यासाठी पदवीधर ही पात्रता आवश्यक असून वेगवेगळ्या पदांसाठी ही संधी उपलब्ध आहे, फ्रेशर्स कॅंडिडेट ना प्राधान्य राहील. तरी शनिवार दिनांक 19 एप्रिल रोजी मुधोजी महाविद्यालयात संबंधितांनी सकाळी दहा वाजता उपस्थित रहावे असे आवाहन मुधोजी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट व करिअर गायडन्स सेलच्या वतीने प्रा. प्रशांत शेटे यांनी केले आहे.